हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 11:59 AM2023-01-07T11:59:01+5:302023-01-07T11:59:21+5:30

मुलाने तक्रार केली की, त्याला आंघोळीसाठी जबरदस्ती केली जात आहे. इतकंच नाही तर पोलीस पोहचले आणि त्यांनी प्रकरण मिटवलं.

Boy called the police against his mother after she asked him to bath in hapur UP | हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग...

हाय थंडी! आईने आंघोळ करण्यास सांगितलं तर मुलाने पोलिसांना केला फोन आणि मग...

googlenewsNext

Boy Called The Police: सध्या सगळीकडेच थंडीची लाट आहे. काही ठिकाणी तर लोक आपल्या घराबाहेर निघण्याची हिंमतही करत नाहीयेत. अशात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्याच आई विरोधात तक्रार करत पोलिसांना बोलवलं. मुलाने तक्रार केली की, त्याला आंघोळीसाठी जबरदस्ती केली जात आहे. इतकंच नाही तर पोलीस पोहचले आणि त्यांनी प्रकरण मिटवलं.

ही घटना उत्तर प्रदेशच्या हापुड़ जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्खापुर भागात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या मुलाला आंघोळ करण्यासाठी सांगितलं तर त्याने नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर वडिलही रागावले. अशात मुलाने 112 वर फोन करून पोलिसांना बोलवलं. मुलाने पोलिसांना सांगितलं की, इतक्या कडाक्याच्या थंडीत त्याची जबरदस्ती आंघोळ केली जात आहे.

इतकंच नाही तर तो हेही म्हणाला की, त्याचे केसही जबरदस्ती कापण्यात आले. त्यानंतर तिथे जेव्हा पोलीस पोहोचले तर हे ऐकून तेही हैराण झाले. सगळेच यावर हसायला लागले होते. सध्या मुलाला कसंतरी समजावून पोलीस तिथून निघून गेले. पण या घटनेची चर्चा सगळीकडे रंगली आहे. असं सांगितलं जात आहे की, मुलाने आपल्या स्टाइलने केस कापण्याचा हट्ट केला होता. पण त्याच्या वडिलांनी त्यांच्या पद्धतीने त्याचे केस कापून घेतले.

नंतर त्याच्या आईने त्याला आंघोळ करण्यास सांगितली. पण मुलाने थंडीचं कारण देत आंघोळ करण्यास नकार दिला. यावर त्याचे वडील त्याला ओरडले आणि त्याने नाराज होऊन पोलिसांना फोन केला. पोलीस आल्यावर आजूबाजूचे लोकही जमा झाले. नंतर मुलाला समजावून वाद मिटवण्यात आला.

Web Title: Boy called the police against his mother after she asked him to bath in hapur UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.