तरुण एकाच वेळी ६ जणींना करत होता डेट! तरुणींनी अशी केली पोलखोल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:18 IST2021-11-09T16:18:09+5:302021-11-09T16:18:30+5:30
तीन तरुणींना जोरदार धक्का बसला जेव्हा त्यांना कळालं की तिघींचाही बॉयफ्रेंड एकच आहे. मग त्यांनी आपल्या धोकेबाज बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्यासाठी आणि धडा शिकवण्याचं ठरवलं.

तरुण एकाच वेळी ६ जणींना करत होता डेट! तरुणींनी अशी केली पोलखोल...
तीन तरुणींना जोरदार धक्का बसला जेव्हा त्यांना कळालं की तिघींचाही बॉयफ्रेंड एकच आहे. मग त्यांनी आपल्या धोकेबाज बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडण्यासाठी आणि धडा शिकवण्याचं ठरवलं. त्यांनी एक रोड ट्रीप प्लान केली आणि त्यात नेमकं काय केलं ते जाणून घेऊयात...
१८ वर्षीय बेकाह (Bekah King), १९ वर्षीय अबी (Abi Robersts) आणि २१ वर्षीय मॉर्गन (Morgan Tabor) या तिघींचाही बॉयफ्रेंड एकच होता. सर्वातआधी मॉर्गन हिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिनं बॉयफ्रेंडच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन तिला अबी बाबत माहिती मिळाली. त्यानंतर तिनं अबी हिच्याशी संपर्क साधला आणि दोघींना आपण एकाच व्यक्तीला डेट करतोय हे कळालं. पण अबीकडून आणखी एका मुलीची माहिती मिळाली. तिचं नावं होतं बेकाह. मग काय दोघींनी तिच्याशीही संपर्क केला. जेव्हा तिघी एकत्र भेटल्या आणि सर्व बिंग फुटलं. बेकाह, अबी आणि मॉर्गन या तिघींना एकच मुलगा डेट करत असल्याचं लक्षात आलं. तिघींनी एकमेकांना भेटून आपल्या धोकेबाज बॉयफ्रेंडची पोलखोल करण्याचं ठरवलं.
बॉयफ्रेंड तिघींसोबत ठराविक काळाच्या अंतरानं रोड ट्रीपवर जाण्याचा प्लान तयार करत होता. पण आपण ज्यांना फसवतोय त्या तिघींची आता एकमेकांसोबत ओळख झालीय याची कल्पना त्याला नव्हती. मग काय तिघींना चांगलीच संधी मिळाली. बेकाह, अबी आणि मॉर्गन या तिघींनीही त्याला भेटायला बोलावलं. जेव्हा बॉयफ्रेंड निर्धारित ठिकाणी पोहोचला तेव्हा या तिघींना एकत्र पाहून त्याला धक्काच बसला. तिघींनीही त्याला जाब विचारला आणि त्याच्यासोबतचं नातं कायमचं संपुष्टात आणलं.
समोर आलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती खरंतर एकाचवेळी ६ जणींना डेट करत होता. त्यातीलच तीन जणींची एकमेकांसोबत चर्चा झाल्यानं संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि धोकेबाज बॉयफ्रेंडचं बिंग फुटलं. बॉयफ्रेंडचं पितळ उघडं पाडल्यानंतर तिघींनीही आपली रोड ट्रिप अजिबात रद्द केली नाही. तिघींनीही एक जुनी बस विकत घेतली आणि तिघी एकत्र रोड ट्रिपला रवाना झाल्या. यात तिघींनी संपूर्ण अमेरिकेची यात्रा केली आणि सर्व क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले. या रोड ट्रिपची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा देखील झाली.