प्रेयसीसोबत झाला ब्रेकअप, २५ हजारांचा मिळाला हार्टब्रेक इन्शुरन्स, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 02:56 PM2023-03-17T14:56:19+5:302023-03-17T14:57:00+5:30

आपल्याकडे इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत.

boy get 25 thousand rupees from heartbreak insuarance fund after girlfriend cheating | प्रेयसीसोबत झाला ब्रेकअप, २५ हजारांचा मिळाला हार्टब्रेक इन्शुरन्स, नेमकं प्रकरण काय?

प्रेयसीसोबत झाला ब्रेकअप, २५ हजारांचा मिळाला हार्टब्रेक इन्शुरन्स, नेमकं प्रकरण काय?

googlenewsNext

आपल्याकडे इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत. हेल्थ इन्शुरन्स, वाहनांसाठी इन्शुरन्स या सारखे अनेक इन्शुरन्स आपण पाहिले आहेत. पण, तुम्ही हार्टब्रेक इन्शुरन्स पाहिला आहे का? एखाद्या प्रियकराला प्रेयसीने धोका दिला तर त्या प्रियकराला हार्टब्रेक इन्शुरन्स दिला जातो, अशी एक घटना समोर आली आहे. एका प्रियकरासोबत त्याच्या प्रेयसीने ब्रेकअप केला म्हणून त्याला २५ हजार रुपये मिळाले असल्याचे त्याने सोशल मीडियावर सांगितले आहे. 

पण एका ट्विटर युजरने प्रेमात हार्टब्रेकसाठी विमा रक्कम म्हणून २५,००० रुपये मिळाल्याचा दावा केला आहे. प्रतीक आर्यन नावाच्या ट्विटर युजरने हा दावा केला आहे. 'माझ्या मैत्रिणीने माझी फसवणूक केली आणि त्यासाठी मला २५ हजार रुपये मिळाले'. जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा आम्ही एकत्र पैसे साठवण्यास सुरुवात केली. आणि त्यातूनच ही रक्कम मिळाली असल्याचे प्रतीक आर्यनने लिहिले आहे. 'माझ्या मैत्रिणीने फसवणूक केल्यामुळे मला २५ हजार रुपये मिळाले आहेत. आमचं नातं सुरू झालं तेव्हा आम्ही दोघेही प्रत्येकी ५०० रुपये जॉइंट अकाउंटमध्ये जमा करायचो. त्यावेळी आम्ही ठरवले होते, जो कोणी फसवणूक करेल, त्याचे पैसे बुडतील आणि जो नातेसंबंधात विश्वासू राहील त्याला हे पैसे मिळतील, असंही त्याने सांगितले. 

झक्कास.. मेव्हण्याच्या लग्नात थिरकला रोहित शर्मा; पत्नी रितीकासोबत केला भन्नाट डान्स

प्रतीक आर्यन याने या रकमेला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड म्हटले आहे. दुसर्‍या पोस्टमध्ये, प्रतीक आर्यनने हार्टब्रेक इन्शुरन्स फंडात गुंतवणूक करणे देखील बाजारातील जोखीम कसे आहे याची गंमत सांगितली आहे. याशिवाय रिलेशनशिप लॉयल्टी रिस्क देखील यामध्ये समाविष्ट आहे. म्हणूनच आपण प्रेमाशी निगडीत वचन अतिशय काळजीपूर्वक पाळले पाहिजे. 

या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.  'एवढ्या रकमेचे काय करणार?' असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे. या पैशाचा मी दुसऱ्या नात्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे, असं उत्तर त्याने दिले. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Web Title: boy get 25 thousand rupees from heartbreak insuarance fund after girlfriend cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.