डोक्याला बंदूक लावून सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा जखमी

By admin | Published: April 30, 2016 04:53 PM2016-04-30T16:53:53+5:302016-04-30T19:06:08+5:30

आपल्या वडिलांची बंदूक डोक्याला लावून अनमदीप सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी बंदूकीतून सुटलेली गोळी रमनदीपच्या डोक्याला लागली असून तो जखमी झाला आहे

A boy was injured in a gunfight with a gun | डोक्याला बंदूक लावून सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा जखमी

डोक्याला बंदूक लावून सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा जखमी

Next
ऑनलाइन लोकमत - 
पठाणकोट, दि. 30 - सेल्फी काढणे जीवावर बेतू शकतं हे अनेक घटनांमधून समोर आलं आहे. अनेकदा उंच इमारतीवर, चालत्या ट्रेनसमोर उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात मृत्यू झालेल्या अनेक घटना आहेत. अशाच प्रकारे डोक्याला बंदूक लावून सेल्फी काढण्याच्या नादात 14 वर्षाचा अमनदीप जखमी झाला आहे. 
 
आपल्या वडिलांची बंदूक डोक्याला लावून अनमदीप सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी बंदूकीतून सुटलेली गोळी अमनदीपच्या डोक्याला लागली असून तो जखमी झाला आहे. अमनदीप दहावीमध्ये शिकत असून श्री गुरु हरकृष्ण शाळेचा विद्यार्थी आहे. लुधियानामधील रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 
 
अमनदीपचे वडील गुरकिरपाल आणि घरातले इतर सदस्य घराबाहेर गेले होते. घरामध्ये अमनदीप आणि त्याची बहिण फक्त दोघेच होते. अमनदीपने आपल्या वडिलांची बंदूक घेतली आणि सेल्फी काढायला गेला. त्याची बहिणदेखील त्याच्यासोबत होती. मोबाईलची बॅटरी संपल्याने ती चार्जर आणायला आतमध्ये गेली. त्यावेळी अमनदीपकडून चुकून फायरिंग झाली ज्यामुळे त्याच्या डोक्याला इजा झाली आहे. गोळीचा आवाज ऐकून शेजारी पळत आले आणि अमनदीपला रुग्णालयात घेऊन गेले. 
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळी डोक्यात घुसली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलीस तपास करत असून रमनदीर बंदुकीशी खेळत होता ? की आत्महत्येचा प्रयत्न करत होता ? याची तपासणी करत आहेत.
 

Web Title: A boy was injured in a gunfight with a gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.