मित्रांसोबत खेळत होता मुलगा, लपला बांग्लादेशमध्ये आणि सापडला मलेशियामध्ये; तेही सहा दिवसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 09:35 AM2023-01-25T09:35:58+5:302023-01-25T09:36:28+5:30

Boy Reached Malaysia From Bangladesh While Playing : हा मुलगा त्याच्या मित्रासोबत लपाछपी खेळत होता. त्याने जरा जास्त डोकं लावलं आणि अशा ठिकाणी लपला की, तो एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचला.

Boy was playing hide and seek hides in Bangladesh into shipping container ends up in another country | मित्रांसोबत खेळत होता मुलगा, लपला बांग्लादेशमध्ये आणि सापडला मलेशियामध्ये; तेही सहा दिवसांनी...

मित्रांसोबत खेळत होता मुलगा, लपला बांग्लादेशमध्ये आणि सापडला मलेशियामध्ये; तेही सहा दिवसांनी...

googlenewsNext

Boy Reached Malaysia From Bangladesh While Playing : सगळ्याच लहान मुलांना लपाछपी खेळायला खूप आवडतं. जिथे त्यांना लपण्यासाठी जागा मिळते ते हा खेळ सुरू करतात. तसा तर हा खेळ फारच मजेदार असतो. पण यात जर काही चूक झाली, मोठं नुकसानही होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एक मुलगा लपाछपी खेळता खेळता एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचला आणि त्याच्या परिवाराला याचा काही पत्ता नाही.

हा मुलगा त्याच्या मित्रासोबत लपाछपी खेळत होता. त्याने जरा जास्त डोकं लावलं आणि अशा ठिकाणी लपला की, तो एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचला. मुलाच्या कुटुंबियांना हे माहीतच नाही की, मुलगा खेळता खेळता समुद्र पार करून दुसऱ्या देशात गेला. ही घटना 11 जानेवारीला बांग्लादेशमध्ये घडली. मुलगा सहा दिवसांनंतर मलेशियात सापडला. ज्या लोकांनी त्याला पाहिलं तेही हैराण झाले. त्यांनाही समजलं नाही की, मुलगा इथे आला कसा?

17 जानेवारीला मलेशियाच्या पोर्ट क्लांगवर स्टाफने जेव्हा बांग्लादेशहून आलेले समुद्री जहाजावरील कंटेनर्स उतरवले तर त्यांना एक वेगळाच नजारा दिसला. या कंटेनरमधून एक मुलगा बाहेर आला. त्याला स्थानिक भाषाही येत नव्हती आणि समजतही नव्हती. अशात त्यांना त्याच्याबाबत काही समजलं नाही. आधी त्यांना वाटलं की, मुलगा ह्यूमन ट्राफिकिंगचा शिकार झालाय. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना बोलवण्यात आलं. नंतर चौकशी करताना अधिकाऱ्यांना समजलं की, मुलगा बांग्लादेशच्या चित्तागोंगचा राहणारा आहे. तो सहा दिवसांपासून कंटेनरच्या आतच बंद होता.

या मुलाचं नाव फाहिम आहे आणि तो चित्तागोंगमध्ये आपल्या मित्रांसोबत लपाछपी खेळत होता. यादरम्यान त्याने लपण्यासाठी कंटेनरची निवड केली आणि चुकून आत बंद झाला. त्याने मदतीसाठी आवाजही दिला होता, पण कुणीच आलं नाही. 6 दिवस तो कंटेनरच्या आतच होता आणि जवळपास 2000 मैल दूर निघून गेला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तो रिकव्हर होत आहे. त्याला परत बांग्लादेशला पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.

Web Title: Boy was playing hide and seek hides in Bangladesh into shipping container ends up in another country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.