बोंबला! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी 'तो' झाला रोमॅंटिक, तिकडे घर जळून झालं राख!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:05 PM2020-08-05T15:05:20+5:302020-08-05T15:08:08+5:30

आता हेच बघा ना...इंग्लंडमधील शेफील्ड शहरातील एका व्यक्तीने गर्लफ्रेन्डला पप्रोज करण्यासाठी रोमॅंटिक वातावरण तयार केलं.

Boyfriend accidentally burns down his flat while proposing to girlfriend for marriage | बोंबला! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी 'तो' झाला रोमॅंटिक, तिकडे घर जळून झालं राख!

बोंबला! गर्लफ्रेन्डला प्रपोज करण्यासाठी 'तो' झाला रोमॅंटिक, तिकडे घर जळून झालं राख!

Next

एखाद्या व्यक्तीवरील आपलं प्रेम व्यक्त करणं काही सोपं काम नाही. त्यासाठी कला असावी लागते. पण सगळेच यात तरबेज असतील असंही नाही. कधी कधी प्रपोज करताना काहीना काही गडबड होते. आता हेच बघा ना...इंग्लंडमधील शेफील्ड शहरातील एका व्यक्तीने गर्लफ्रेन्डला पप्रोज करण्यासाठी रोमॅंटिक वातावरण तयार केलं. यासाठी त्याने प्लॅटमध्ये १०० टीलाइट कॅंडलने रोषणाई केली. पण या मेणबत्त्यांनी घरातील वातावरण रोमॅंटिक होण्याऐवजी घराला आग लागली.

साउथ यॉर्कशायर फायर अ‍ॅन्ड रेस्क्यू सर्व्हिसने ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, 'लक्ष देऊन बघा. काय दिसतंय तुम्हाला? शेकडो टीलाइट कॅंडल्स. काय झालं होतं जाणून घ्यायचंय का? हे सगळं एका रोमॅंटिक प्रपोजलसाठी होतं. जे पूर्णपणे वेगळं झालं. यातून इतरांना हे शिकायला मिळालं की, मेणबत्तीचा वापर कसा करावा आणि करू नये'.

ही घटना सोमवारी शेफील्डच्या Abbeydale Road वर घडली. व्यक्ती घर कॅंडलने सजवून गर्लफ्रेन्डला घेण्यासाठी बाहेर गेला होता. पण जेव्हा कपल घरी परतलं तेव्हा घरात मोठी आग लागली होती. फायर फायटर्सनी वेळीच घटनासथळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. हे सगळं तरी दुसरीकडे मुलीने लग्नासाठी होकार दिला.

हे पण वाचा  :

काय सांगता! तुरूंगातील मुलाला वाचवण्यासाठी आईने हाताने खोदला ३५ फूट भुयारी मार्ग आणि...

क्या बात! रस्त्यावरील कुत्र्याचं फळफळलं नशीब, ह्युंदाई शोरूमने बनवलं सेल्समॅन!

Web Title: Boyfriend accidentally burns down his flat while proposing to girlfriend for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.