प्रियकराच्या हाती लागला प्रेयसीचा असा फोटो, बघताच ब्रेकअपचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:15 PM2022-05-05T16:15:24+5:302022-05-05T16:30:43+5:30
Relationship Story : महिलेने आपली ओळख लपवून तिची स्टोरी सांगितली. ती म्हणाली की, ती आणि तिचा पार्टनर गेल्या अडीच वर्षांपासून सोबत आहे. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडतं.
Relationship Story : लोक प्रेमात पडले की, फारच जवळ येतात. त्यांना एकमेकांच्या सर्वच गोष्टी माहीत असतात. पण जर प्रेमात कुणी काही लपवलं तर याने नातं घट्ट होत नाही. सोशल मीडिया साइट रेडिटवर एका महिलेने तिची स्टोरी शेअर करत सांगितलं की, तिने तिच्या प्रियकरापासून अशी गोष्ट लपवली होती जी समजल्यावर तो संतापला. ही महिला वयाच्या २०व्या वर्षीच आई झाली होती. पण ही बाब तिने प्रियकरापासून लपवली. पण अचानक जेव्हा त्याला हे समजलं तेव्हा दोघांचं नातं तुटण्याच्या वळणावर आलं.
महिलेने आपली ओळख लपवून तिची स्टोरी सांगितली. ती म्हणाली की, ती आणि तिचा पार्टनर गेल्या अडीच वर्षांपासून सोबत आहे. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवणं आवडतं. तिच्या पार्टनरने अनेक बाळाची ईच्छा व्यक्त केली होती. पण महिलेने स्पष्ट सांगितलं होतं की तिला मुलं नकोत. अशात महिलेच्या परिवारातील कुणाच्यातरी बर्थडे पार्टीमध्ये जुने फोटो दाखवले जात होते. यातच महिलेच्या प्रियकराने प्रेयसीचा असा फोटो पाहिला ज्यात ती ९ महिन्यांची गर्भवती दिसत होती. बस मग का...कपलचं भांडण सुरू झालं.
महिलेने सांगितलं की, जेव्हा ती २० वर्षांची होती तेव्हा तिच्या बहिणीसाठी ती सरोगेट मदर बनली होती. तिच्या बहिणीला गर्भधारणेत काही अडचणी येत होत्या आणि अनेकदा तिचं मिसकॅरेज झालं होतं. अशात आपल्या बहिणीची मदत करण्यासाठी ती बहिणीच्या बाळाची आई झाली होती. म्हणजे बहिणीचं बाळ तिने तिच्या पोटात वाढवलं होतं. महिलेने लिहिलं की, बाळाला जन्म दिल्यावरही तिला बाळांची फार ओढ नव्हती. त्यावेळी तिने ठरवलं होतं की, ती कधीच पुन्हा आई होणार नाही. आता महिलेचं बाल ७ वर्षांचं झालं आहे.
रेडिटवर u/HelicopterNo3063 नावाच्या अकाऊंटवर महिलेने आपली स्टोरी शेअर केली. महिलेने सांगितलं की, तिच्या प्रियकराला वाटतंय की, तिने तिचं बाळ दत्तक दिलं आहे. तिने प्रियकाराला सगळं खरं सांगितलं तरीही तो काही ऐकायला तयार नाही. तो अजूनही नाराज आहे आणि संतापला आहे
महिलेने लिहिलं की, आता तिचा प्रियकर म्हणतो की, जर मी माझ्या बहिणीच्या बाळाला जन्म देऊ शकते तर मग स्वत:च्या बाळासाठी काय समस्या आहे. अनेक लोकांनी महिलेला रेडिटवर अनेक सल्ले दिले. काही लोक म्हणाले की तिच्या प्रियकराला पिता बनण्याचा अधिकार आहे. त्याच्याकडून तो अधिकार हिसकावला जाऊ नये.