गर्लफ्रेन्डच्या आईला तरूणाने किडनी केली दान, ऑपरेशननंतर तरूणीने दुसऱ्यासोबत केलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 03:09 PM2022-01-18T15:09:49+5:302022-01-18T15:10:00+5:30
Boyfriend donated kidney to girlfriend’s mother : एका बॉयफ्रेन्डने त्यापुढेही जाऊन आपल्या गर्लफ्रेन्डसाठी असं काही केलं की, वाचल्यावर तुमच्याही लक्षात येईल की तो त्याच्या गर्लफ्रेन्डच्या किती प्रेमात होता.
असं म्हणतात की, लोक प्रेमात पडले की आंधळे होतात. तशी तर ही केवळ म्हण आहे. पण अनेकदा अशी लोकं भेटतात. प्रेमात पडलेले लोक सगळंकाही आपल्या पार्टनरला देण्यासाठी अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, एका बॉयफ्रेन्डने त्यापुढेही जाऊन आपल्या गर्लफ्रेन्डसाठी असं काही केलं की, वाचल्यावर तुमच्याही लक्षात येईल की तो त्याच्या गर्लफ्रेन्डच्या किती प्रेमात होता. पण त्याची गर्लफ्रेन्ड त्याच्यावर तेवढं प्रेम करत नव्हती.
'द सन'च्या वृत्तानुसार, मेक्सिकोमध्ये (Mexico) राहणारा शिक्षक ऊजिएल मार्टिनेजने टिकटॉकवर एक हैराण करणारी बाब सांगितली. जी ऐकल्यावर लोक हैराण झाले. ऊजिएलने सांगितलं की, त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डच्या आईला त्याची एक किडनी दान दिली होती. पण असं केल्यावर त्यानंतर जे झालं ते धक्कादायक होतं.
ऊजिएलने सांगितलं की, त्याने त्याच्या गर्लफ्रेन्डच्या आईला किडनी दिली. ऑपरेशनच्या एक महिन्यानंतरच त्याच्या गर्लफ्रेन्डने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. इतकंच नाही तर तिने दुसऱ्या तरूणासोबत लग्नही केलं. यामुळे ऊजिएल फारच दु:खी आहे. त्याने त्याच्या टिकटॉकवर व्हिडीओ शेअर केला आणि सोफ्यावर झोपल्या झोपल्या या घटनेबाबत सांगितलं.
सोशल मीडियावर लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि लोक त्याला समजावत आहेत की, त्याने दु:खी होऊ नये. एका व्यक्ती म्हणाला की, तुला दु:खी होण्याची गरज नाहीये. कारण तिने एका फारच दिलदार व्यक्तीला गमावलं आहे. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलं की, तू पुढे जा आणि अशा मुलीची निवड कर जी तुझा स्वीकार करेल.
रिपोर्टनुसार, या व्यक्तीने या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो म्हणाला की, त्याच्यात आणि त्याच्या गर्लफ्रेन्डमध्ये अजूनही चांगलं रिलेशन आहे. तो म्हणाला की, तो इमोशनली ठीक आहे आणि त्याने हेही सांगितलं की, त्याची गर्लफ्रेन्डही इमोशनली ठीक आहे. तो म्हणाला की, त्याला काही तक्रार नाही.
हे पण वाचा :
रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला, पण हा कृष्णजन्मभूमीचा वाद काय आहे?