आजारी गर्लफ्रेंडला डोनेट केलं आपलं लिव्हर, मग केलं तिच्याशी लग्न: पण....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:42 PM2022-10-13T12:42:32+5:302022-10-13T12:43:07+5:30

ही घटना पाकिस्तानच्या लाहोरमधील आहे. पाकिस्तानी यूट्यूबर सैयद बासित अलीने या कपलसोबत संवाद साधला. तरूणाचं नाव आहे शहजाद तर त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे नैना आहे.

Boyfriend donates liver for girlfriend, then married to her but his family not happy | आजारी गर्लफ्रेंडला डोनेट केलं आपलं लिव्हर, मग केलं तिच्याशी लग्न: पण....

आजारी गर्लफ्रेंडला डोनेट केलं आपलं लिव्हर, मग केलं तिच्याशी लग्न: पण....

Next

Pakistani Couple Emotional Love Story: प्रेमात लोक आंधळे होतात. सध्या पाकिस्तानातील एक लव्हस्टोरी चांगलीच व्हायरल झाली आहे. यात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसाठी त्याचं लिव्हरही काढून दिलं. त्याने त्याच्या आजारी गर्लफ्रेंडला आश्वासन दिलं होतं की, तो तिच्यासोबत लग्न करणार. यानंतर त्याने परिवार आणि समाजाची चिंता न करता तिच्यासाठी त्याने सीमा वार केली आणि त्याने त्याचं आश्वासन पूर्ण केलं.

ही घटना पाकिस्तानच्या लाहोरमधील आहे. पाकिस्तानी यूट्यूबर सैयद बासित अलीने या कपलसोबत संवाद साधला. तरूणाचं नाव आहे शहजाद तर त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे नैना आहे. दोघे सोबत शिकले आणि नंतर सोबतच एकाच कंपनीत नोकरी करत होते. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांना लग्न करायचं होतं.

काही दिवसांआधी नैनाची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी असे काही रिपोर्ट्स दिले की, शहजाद आणि नैना दोघांनाही धक्का बसला. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, नैनाच्या लिव्हरमध्ये समस्या आहे आणि ते बदलावं लागेल. जर ते बदललं नाही तर नैनाचा जीवही जाऊ शकतो. त्यानंतर शहजादने नैनाला त्याचं लिव्हर देण्याची घोषणा केली.

शहजादच्या घरातील लोक यासाठी तयार नव्हते. पण शहजादने लिव्हर काढून नैनाला दिलं. नैना बरी झाली आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. पण लग्नात शहजादच्या परिवारातील लोक आले नव्हते. दोघेही म्हणाले की, ते खूप आनंदी आहेत. पण याचं दु:खं आहे की, शहजादचे परिवारातील लोक या लग्नाने आनंदी नाहीत. ते म्हणाले की, प्रेमापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही.

Web Title: Boyfriend donates liver for girlfriend, then married to her but his family not happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.