गर्लफ्रेन्डच्या आईवर फिदा झाला बॉयफ्रेन्ड, मुलगी व्हिडीओ शेअर करत म्हणाली -
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:03 PM2021-08-24T12:03:09+5:302021-08-24T12:07:46+5:30
यूटाची फॅशन आणि लाइफस्टाईल इनफ्लुएंसर एलिसा नियमितपणे आपल्या पेजवर आउटफिटचे फोटो पोस्ट करत असते.
यूएसची टिकटॉक स्टार आणि फॅशन-लाइफस्टाईल इन्फ्लुएंसरचा एक टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलिसा किम्बर नावाची फॅशन आणि लाइफस्टाईल इन्फ्लुएंसरने टिकटॉकवर एक व्हिडीओ जारी करून आईबाबत एक इनसिक्युरिटी जाहीर केली. २६ वर्षीय एलिसा आणि तिच्या आईचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत. हे फोटो पाहून हे ओळखणं कठिण आहे की, आई कोण आहे आणि मुलगी कोण. हेच एलिसासाठी अडचणीचं ठरलं आहे.
यूटाची फॅशन आणि लाइफस्टाईल इनफ्लुएंसर एलिसा नियमितपणे आपल्या पेजवर आउटफिटचे फोटो पोस्ट करत असते. कधी कधी आईसोबतचे फोटो शेअर करते. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्सन दिलं की, 'जेव्हा तुमची आई ४६ वयातही तुमच्यापेक्षा चांगली दिसते'. आता एलिसा किंबरने दावा केला आहे की, तिच्या बॉयफ्रेन्डचं मन तिच्या आईवर आलं आहे.
एका दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'माझे सगळे क्रश मला सोडून माझ्या आईला पसंत करतात'. यावर एका यूजरने लिहिले की, 'मी अजूनही कन्फ्यूज आहे की, कोण आई आहे आणि कोण मुलगी?'.
एलिसाच्या पोस्टवर यूजर्सच्या कमेंट्स येत आहे, ज्या तिची समस्या वाढवणाऱ्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'काय तुझी आई सिंगल आहे?'. असं असलं तीर आधीच्या सर्व फोटोमध्ये एलिसा आणि तिच्या आईचं चांगलं बॉंडींग दिसत आहे. सोशल मीडियावर आई-मुलीच्या फोटोंना त्यांचे फॉलोअर्स पसंत करतात. एलिसाही नेहमीच आपल्या आईच्या सुंदरतेचं कौतुक करत असते.