कितने तेजस्वी लोग है! बॉयफ्रेंडला सांगायची घरभाडं भरायला; स्वत:च निघाली घर मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 03:33 PM2021-09-07T15:33:03+5:302021-09-07T15:33:49+5:30

तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; तरुणीचा सगळा खर्च प्रियकरच करतोय

boyfriend paid bill of girlfriend home couple living together landlord girl video | कितने तेजस्वी लोग है! बॉयफ्रेंडला सांगायची घरभाडं भरायला; स्वत:च निघाली घर मालकीण

कितने तेजस्वी लोग है! बॉयफ्रेंडला सांगायची घरभाडं भरायला; स्वत:च निघाली घर मालकीण

Next

एका तरुणीनं प्रियकराबद्दल टिकटॉक व्हिडीओ केला. तरुणीनं केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत १५ लाखांहून अधिक जणांनी महिलेचा व्हिडीओ पाहिला आहे. त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियादेखील येत आहेत. काहींनी तरुणीला हुशार म्हटलंय, तर प्रियकराचा वापर करून घेते म्हणून काहींनी तिच्यावर टीका केली आहे.

टिकटॉकवर @jaynedoee0 नावानं अकाऊंट असलेल्या तरुणीनं तिच्या प्रियकराबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'आम्ही दोघे गेल्या वर्षभरापासून एकाच घरात राहत आहोत. घराचं भाडं प्रियकरच भरतो. बाकीचा खर्चदेखील तोच करतो,' असं तिनं व्हिडीओत म्हटलं आहे. मात्र त्यानंतर तरुणीनं सांगितलेली गोष्ट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 'आम्ही ज्या घरात राहतो, त्याची मालकीण मीच आहे. पण माझ्या प्रियकराला याची कल्पना नाही,' असं तरुणीनं म्हटलं आहे.

अजब रिवाज! पती जिवंत असतानाही दरवर्षी विधवा होतात येथील महिला, कारण...

घरमालक असूनही तरुणी तिच्या प्रियकराकडून घरभाडं घेत आहे. याशिवाय इतर खर्चदेखील तोच करत आहे. प्रियकराला याची पुसटशीही कल्पना नसल्यानं तो दर महिन्याला घरभाडं देतो. 'प्रियकर माझ्याच मालकीच्या घरात राहतो आणि तो दर महिन्याला न चुकता घरभाडं भरतो. ही गोष्ट त्याला समजल्यावर काय होईल? त्याला वेड लागेल का?', असा प्रश्न तरुणीनं व्हिडीओमधून विचारला आहे.

Web Title: boyfriend paid bill of girlfriend home couple living together landlord girl video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.