अजबच! काय करतो, कुठे जातो? पाहण्यासाठी ती 'असं' करते बॉयफ्रेंडला ट्रॅक; पद्धत पाहून व्हाल शॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 07:09 PM2022-05-19T19:09:38+5:302022-05-19T19:15:13+5:30
'जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल तर तुम्ही अशाप्रकारे त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता', असं देखील जेसिकाने म्हटलं आहे.
प्रेमाचे भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकत असतो. काही रिलेशनशिपमध्ये मुलं किंवा मुली हे फारच पझेसिव्ह असतात. आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड दिवसभरात नेमकं काय करतो, कोणाकोणाला भेटतो याची सर्व माहिती त्यांना पाहिजे असते. अशीच एक भन्नाट घटना आता समोर आली आहे. एका तरुणीने गुपचूप आपल्या बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवलं आहे. जेसिका शॉ असं या तरुणीचं नाव असून तिने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या बॉयफ्रेंडचं लोकेशन कसं ट्रेस करते याबाबत तिने खुलासा केला आहे.
जेव्हा माझा बॉयफ्रेंड त्याचं लोकेशन शेअर करण्यास नकार देतो तेव्हा मला त्याचा पत्ता कसा समजतो?' असा प्रश्न विचारून तिने समोरच्याच्या नकळत त्याचं लोकेशन कसं ट्रेस करायचं हे आपल्या फॅन्सना सांगितलं आहे. जेसिकाने आपल्या या व्हिडिओमध्ये मोबाईल सेटिंग्जमध्ये कशाप्रकारे बदल करायचे याचीदेखील माहिती दिली आहे. बॉयफ्रेंडच्या फोनमधील सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. लोकेशन सर्व्हिस टॅबमध्ये तुम्ही काही लोकेशन्सवर क्लिक करू शकता. त्यानंतर तिथे बॉयफ्रेंडनं सर्वाधिक भेट दिलेली ठिकाणं दिसतील.
क्लिक करून तुम्ही तो कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी होता हे समजू शकतं. 'जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल तर तुम्ही अशाप्रकारे त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता', असं देखील जेसिकाने म्हटलं आहे. तसेच 'जास्त विचार करण्याची गरज नाही...मला माहिती आहे मी वेडेपणा करत आहे,' असं कॅप्शन जेसिकानं आपल्या व्हिडिओला दिलं आहे. यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट केली आहे, 'जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असं काही करायचं असेल त्या व्यक्तीपासून वेगळं झालं पाहिजे.' आणखी एका युजरनं जेसिकाला सल्ला दिला आहे की, 'जर पार्टनर हुशार असेल तर तो काही लोकेशनचे डिटेल्स डिलीटही करू शकतो.' जेसिकाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.