बाबो! गर्लफ्रेंडसाठी 'त्याने' तब्बल 4 कोटींची रिंग घेतली पण सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 08:01 PM2022-01-19T20:01:40+5:302022-01-19T20:06:09+5:30

गर्लफ्रेंडवर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करणाऱ्या एक तरुणाला मोठा धक्का बसला आहे.

boyfriend spend huge money on girlfriend diamond ring girl cheated rich boy propose | बाबो! गर्लफ्रेंडसाठी 'त्याने' तब्बल 4 कोटींची रिंग घेतली पण सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली

बाबो! गर्लफ्रेंडसाठी 'त्याने' तब्बल 4 कोटींची रिंग घेतली पण सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली

Next

प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. गर्लफ्रेंडवर दर महिन्याला लाखो रुपये खर्च करणाऱ्या एक तरुणाला मोठा धक्का बसला आहे. गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी एक तरुणाने 400,000 पाउंड म्हणजेच जवळपास 4 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली होती. पण त्याचवेळी एक सत्य समजलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सहा महिन्यांच्या रिलेशननंतर त्याला तरुणीसोबत लग्न करायचं होतं पण आपल्या गर्लफ्रेंडचा इतर पुरुषांसोबतही संपर्क असल्याचं समजताच तो खूप दु:खी झाला.

मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या Chelsea मध्ये राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाचं नाव मोस मेफेयर (Mohs Mayfair) असं आहे. मेफेयर आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी एका खास पद्धतीने प्रपोज करणार होता. त्यासाठी तो 5.5 कॅरेट व्हाइट रेडिएंट कट प्लॅटिनम रिंग घेऊन जाणार होता. त्याने रिंगची ऑर्डर देखील दिली होती. त्याची किंमत ही जवळपास चार कोटींहून अधिक होती. पण तिला प्रपोज करण्याआधीच त्याला सत्य समजलं आणि धक्काच बसला. 

एके दिवशी मेफेयरने आपल्या गर्लफ्रेंडचं इन्स्टाग्राम अकाऊंट आपल्या मोबाईलवर लॉग इन केलं होतं. त्याचवेळी त्याने तरुणीचं दुसऱ्या एक व्यक्तीसोबत सुरू असलेलं चॅट पाहिलं होतं. त्या दोघांमधील फ्लर्टी मेसेज पाहून तो हैराण झाला. चॅटमध्ये तिने त्या  व्यक्तीला मेफेयर हा तिचा एक्स असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मेफेयरने तिच्यापासून वेगळं होण्याचा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं. 

आपल्या गर्लफ्रेंडवर खूप जास्त पैसे खर्च केल्याचं देखील मेफेयरने म्हटलं आहे. तो तिच्यासोबत नेहमीच एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये लंच आणि डिनर करण्यासाठी जायचा. शॉपिंगला घेऊन जायचा. यासोबतच तिला खूप महागडी गिफ्ट्स द्यायचा. असं करून तो तिच्यावर महिन्याला जवळपास 15 लाख रुपये खर्च करायचा असं म्हटलं आहे. फसवणूक झाल्याचं समजताच त्याने लगेचच ब्रेकअप केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: boyfriend spend huge money on girlfriend diamond ring girl cheated rich boy propose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.