महिलेने घर विकून जमा केले होते पैसे, प्रियकर 1 कोटी घेऊन फरार झाला; दुसऱ्या महिलेशी केलं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:40 AM2022-07-30T11:40:27+5:302022-07-30T11:41:01+5:30
पॅस्ले शेरिफ कोर्ट (ब्रिटन) मध्ये सुनावणी दरम्यान समोर आलं की, लिंडाने विलियम डनला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती. ज्यामुळे डन पैसे काढू शकत होता.
एका व्यक्तीची गर्लफ्रेन्ड आजारी होती. पण तो गर्लफ्रेन्डच्या अकाउंटमधून गपचूप पैसे गायब करत होता. तो इतक्यावरच थांबला नाही आणि त्याने एका दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. नुकतीच याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. विलियम डन(69) ने कथितपणे आपली गर्लफ्रेन्ड लिंडा ग्रांट(63) च्या अकाउंटमधून साधारण 1 कोटी 15 लाख रूपये हडपले. आणि मग करेन डोलन नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. लिंडाचा दावा आहे की, जे पैसे तिच्या अकाउंटमध्ये होते ते तिने घर विकून जमा केला होते.
पॅस्ले शेरिफ कोर्ट (ब्रिटन) मध्ये सुनावणी दरम्यान समोर आलं की, लिंडाने विलियम डनला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती. ज्यामुळे डन पैसे काढू शकत होता. लिंडाने कोर्टात सांगितलं की, पॉवर ऑफ अटॉर्नीबाबत तिला काहीच माहीत नव्हतं. तर डनने सर्व आरोप फेटाळले आहेत. डनवर आरोप आहे की, त्याने 1 कोटी रूपयांपेक्षा जास्तची लूट केली.
कोर्टाच्या सुनावणीत सांगण्यात आलं की, जेव्हा डन हे सगळं करत होता तेव्हा लिंडा अनेक आजारांनी ग्रस्त होती. तिला ब्रेन इंजरी होती. लिंडा डनच्या एल्डरस्लीमधील घरात रहायला गेली होती. दोघांनी इथे जाऊन प्लानिंग केलं होतं की, ते आयुष्यभर इथेच राहतील.
लिंडाने तिच्या मुलांनाही हे सांगितलं होतं की, ती जर मरण पावली तर डन याला 38 लाख रूपये द्यावे. पण जेव्हा डनने गपचूप दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं तर लिंडाचे मुलंही हैराण झाले. लिंडाची मुलगी गिलियनने सांगितलं की, डनच्या नव्या प्रेम प्रकरणाची सुरूवात 2016 मध्ये झाली होती. तेव्हा तिची आई केअर होममध्ये होती.
कोर्टात डनच्या वकिलाने सांगितलं की, डनने लिंडा आणि तिच्या मुलांना संपत्ती कमी दाखवण्याबाबत बोलणी केली होती. कारण केअर होममध्ये जास्त पैसे खर्च होत होते. जे वाचवता यावे. डनने हा दावा केला की, त्याने लिंडाच्या पैशांची गुंतवणूक केली.
लिंडाने डनच्या गुंतवणूक आणि इतर सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं. ती कोर्टात म्हणाली की, तिला याबाबत अजिबात काही माहीत नव्हतं. लिंडाने कोर्टात सांगितलं की, जेव्हा ती केअर होममधून परत आली तेव्हा अकाउंटमध्ये फार कमी पैसे शिल्लक होते. घर विकून जे पैसे अकाउंटमध्ये ठेवले होते. ते सगळे गायब झाले होते. याप्रकरणी सुनावणी कोर्टात सुरू राहणार आहे.