बोंबला! बॉयफ्रेंडने चुकून बेडवर केली लघवी, संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाउल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 09:03 AM2023-01-23T09:03:09+5:302023-01-23T09:03:57+5:30
Boyfriend Urinated On Bed: कधी कधी भांडणं इतकी वाढतात की, दोघांपैकी एकाचं मोठं नुकसान होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडवर चाकूने वार केला.
Boyfriend Urinated On Bed: जगभरातून कपल आणि रिलेशनशिपच्या अनेक हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. कपल्समधील भांडणं हा काही नवा विषय नाही. पण अनेकदा भांडणाची कारणं फारच अजब असतात. कधी कधी भांडणं इतकी वाढतात की, दोघांपैकी एकाचं मोठं नुकसान होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडवर चाकूने वार केला. कारण बॉयफ्रेंडने चुकून बेडवर लघवी केली होती.
ही घटना अमेरिकेच्या लुइसियानामधील आहे. फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, कपल साधारण 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं. नुकतेच दोघेही एका पार्टीला गेले होते. ते तिथून जेव्हा परत आले तेव्हा बराच उशीर झाला होता आणि दोघेही नशेत होते. यादरम्यान बॉयफ्रेंडने चुकून बेडवर लघवी केली. त्यामुळे तरूणीला फारच राग आला.
बॉयफ्रेंडच्या या कृत्याचा तरूणीला इतका राग आला की, तिने त्याच्या पाठीत चाकूने वार केला. तो जखमी स्थितीत पोलिसांकडे पोहोचला. पोलिसांनी आरोपी तरूणीला अटक केली. आपल्या स्पष्टीकरणात तरूणीने सांगितलं की, त्या या कारणाने वैतागली होती की, तिच्या बॉयफ्रेंडने बेडवर लघवी केली. तिने पोलिसांना हेही सांगितलं की, भांडणादरम्यान तिच्या बॉयफ्रेंडने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला.
तरूणीने सांगितलं की, तो इतका नशेत होता की, त्याने स्वत:च्या बचावासाठी त्याच्या डाव्या हातावर चाकूने वार केला. तो हेही म्हणाला की, तिनेच बॉयफ्रेंडला फर्स्ट-एड दिलं आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.