गर्लफ्रेंडच्या घरात घुसून राडा घातला; कोर्टाची शिक्षा ऐकून बॉयफ्रेंड नाचू लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 08:36 AM2023-05-10T08:36:04+5:302023-05-10T08:36:46+5:30
झोपलेल्या गर्लफ्रेंडचे केस कापणारा आणि तिच्या घरात तोडफोड करणाऱ्या बॉयफ्रेंडचे नाव ओवेन जेम्स टाइसो आहे.
एक व्यक्ती बळजबरीनं त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरात घुसला, त्याने झोपलेल्या गर्लफ्रेंडचे केस कापले. इतकेच नाही तर घरात तोडफोड केली. कार, टीव्ही, खिडक्या फोडल्या. गर्लफ्रेंडने विश्वासघात केल्यामुळे संतापलेल्या बॉयफ्रेंडने हे कृत्य केले. त्यानंतर गर्लफ्रेंडच्या तक्रारीवरून पोलिसांनी बॉयफ्रेंडला अटक केली. त्यानंतर या प्रकरणात कोर्टाने सुनावणी घेत निर्णय दिला आहे. मात्र हा निर्णय ऐकून बॉयफ्रेंड कोर्टाच्या बाहेर गर्लफ्रेंडसमोरच नाचू लागला.
ब्रिटनच्या नॉर्थम्प्टन येथील हा प्रकार आहे. माहितीनुसार, झोपलेल्या गर्लफ्रेंडचे केस कापणारा आणि तिच्या घरात तोडफोड करणाऱ्या बॉयफ्रेंडचे नाव ओवेन जेम्स टाइसो आहे. गर्लफ्रेंडने माझा विश्वासघात केला त्यामुळे रागाच्या भरात मी हे कृत्य केले अशी कबुली जेम्सने कोर्टात दिली. त्याचसोबत मी शारिरीकरित्या मुलीला कुठलीही हानी पोहचवली नाही. आम्ही ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो असेही त्याने कोर्टाला सांगितले.
या प्रकरणाच्या सुनावणीनंतर नॉर्थम्प्टन क्राऊन कोर्टाच्या जजने जेम्सला जेलमध्ये पाठवले नाही. त्याला सुधारण्यासाठी कोर्टाने संधी दिली. न्यायाधीशांनी हा निकाल दिला. मात्र शिक्षेतंर्गत जेम्सला जेलमध्ये जावे लागले नसले तरी कोर्टाने त्याच्यावर १२ महिने प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्याला रिहैब सेंटरलाही पाठवले आहे.
मुलीला द्यावे लागणार २५ हजार नुकसान भरपाई
कोर्टाने जेम्सला आदेशही दिले की, नुकसान भरपाई म्हणून मुलीला २५ हजार रुपये आणि कोर्टाचा खर्च जेम्ला द्यावा लागेल. न्यायालयाने ही शिक्षा सुनावल्यानंतर जेम्सला काहीही पश्चाताप झाला नाही. त्याने कोर्टाच्या बाहेर येत गर्लफ्रेंडसमोर डान्स केला. सोशल मीडियात या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. या प्रकारानंतर जेम्सची नोकरी गेली, त्याला पोलीस कस्टडीत राहावे लागले. तो सराईत गुन्हेगार नाही. त्यादिवशी जो प्रकार घडला तो रागाच्या भरात घडला असा युक्तिवाद जेम्सच्या वकिलांनी कोर्टात मांडला होता.