असे कपडे घालून केक विकत होती तरूणी की लागली तरूणांची लाईन, गर्दी बघून आले पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:58 PM2021-11-27T15:58:57+5:302021-11-27T16:00:59+5:30
केक विकणाऱ्या या तरूणीच्या मागे इतके वेडे झाले की, तिचं दुकान उघडण्याआधीच दुकानाबाहेर लांब लाईन लागलेली असते.
थायलॅंडच्या (Thailand) बॅंकॉकमधून (Bangkok) एक हैराण करणार घटना समोर आली आहे. इथे एका केक विकणाऱ्या तरूणीला बघण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरूणांची लांबच लांब लाईन लागत आहे. केक विकणाऱ्या या तरूणीच्या मागे इतके वेडे झाले की, तिचं दुकान उघडण्याआधीच दुकानाबाहेर लांब लाईन लागलेली असते. अशात पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तरूणीची चौकशी केली.
नर्सिंगची स्टुडंट आहे तरूणी
'द मिरर'मद्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, या तरूणीचं नाव ऑलिव अरन्या अपैसो आहे. अरन्या २३ वर्षांची आहे. आणि ती नर्सिंगची स्टुडंट आहे. त्यासोबतच ती केक विकण्याचं कामही करते.
दुकानाबाहेर लागते लाईन
अरन्या केस विकताना एक स्पेशल टॉप घालते. जो फार छोटा आणि रिव्हिलिंग आहे. त्यामुळे तिच्या दुकानावर तरूणांची लांबच लांब रांग लागते. अरन्या म्हणाली की, जेव्हापासून ती हा टॉप घालणं सुरू केलं, तेव्हापासून तिचा धंदा चार पटीने वाढला आहे. आधी ती दिवसातून ३० केक विकत होती, आता ती दिवसाला १०० ते १२० केस विकते.
अरन्याने सांगितलं की, लोक तिच्याकडून केक खरेदी करतात आणि तिच्यसोबत सेल्फीही काढतात. इतकंच नाही तर लोक फुकटात तिच्या दुकानाचं सोशल मीडियावरून प्रमोशनही करतात. याने तिला फायदा होता म्हणून ती आनंदी आहे.
पोलिसांनी दिला इशारा
अरन्याच्या दुकानाजवळ राहत असलेल्या काही लोकांनी यावर आक्षेप घेतला आणि पोलिसांकडे अरन्याची तक्रार केली. हे लोक म्हणाले की अरन्याचा व्यवहार चांगला नाही. ती जे करत आहे ते समाजासाठी चांगलं नाही. यानंतर पोलिसांची टीम अरन्याच्या दुकानात पोहोचली आणि त्यांनी तिला इशारा दिला की, पुन्हा तसा टॉप घालून केक विकायचा नाही.