आश्चर्यकारक! मृत समजून रूग्णाचं हृदय काढणार होते डॉक्टर, अचानक जिवंत झाली व्यक्ती आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 09:52 AM2024-10-22T09:52:54+5:302024-10-22T09:54:15+5:30

या व्यक्तीचं हृदय दान करण्यासाठी काढलं जाणार होतं. ज्यासाठी डॉक्टरांनी तयारी देखील केली होती.

Brain dead patient miraculously comes back to life just as doctors prepare to remove heart | आश्चर्यकारक! मृत समजून रूग्णाचं हृदय काढणार होते डॉक्टर, अचानक जिवंत झाली व्यक्ती आणि...

आश्चर्यकारक! मृत समजून रूग्णाचं हृदय काढणार होते डॉक्टर, अचानक जिवंत झाली व्यक्ती आणि...

रूग्णांच्या अनेक अजब घटना नेहमीच समोर येत असतात. ज्या फारच अवाक् करणाऱ्या असतात. कधी शवविच्छेदनासाठी घेऊन गेलेला रूग्ण जागा होतो तर कधी चितेवरील व्यक्ती उठून उभी होते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. डॉक्टरांनी ज्या व्यक्तीला ब्रेन डेड घोषित केलं होतं, ती व्यक्ती अचानक जिवंत झाली. 

ही घटना अमेरिकेच्या एका हॉस्पिटलमधून समोर आली आहे. या व्यक्तीचं हृदय दान करण्यासाठी काढलं जाणार होतं. ज्यासाठी डॉक्टरांनी तयारी देखील केली होती. तेव्हाच ब्रेन डेड रूग्णाच्या शरीरात जीव आला. डॉक्टर त्याचं हृदय काढून दुसऱ्याच्या शरीरात बसवणार होते. रूग्णाचं नाव थॉमस टीजे हूवर द्वितीय आहे, ज्याचं वय 36 वर्षे आहे.

थॉमसला 2021 मध्ये ड्रग ओवरडोजमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला ब्रेन डेड घोषि करण्यात आलं. या स्थितीत रूग्णाचा मेंदू मेलेला असतो. मेदुचं नुकसान झालेलं असतं आणि ही रूग्ण बरा होणं जवळपास अशक्य असतं. या स्थितीतही मृत व्यक्तीमध्ये जिवंत व्यक्तीसारखी लक्षणं दिसू लागतात. त्यांची त्वचा गरम असते, हृदय धडधडत असतं आणि व्हेंटिलेशनसोबत छाती वर-खाली होत असते. अवयव दानासाठी अशा रूग्णांचं हृदय घेतलं जातं. पूर्णपणे मृत झाल्यावर हृदय काढून दुसऱ्या कुणाला बसवणं शक्य नसतं.

केंटकी ऑर्गन डोनर एफिलिएट्स (KODA) चे माजी कर्मचारी निकोलेटा मार्टिन यांच्यानुसार, हा रूग्ण हात-पाय इतके-तिकडे मारत होता. हे कुणासाठीही एखाद्या वाईट स्वप्नासारखं आहे. सर्जरी दरम्यान जिवंत राहणं आणि हे समजणं की, कुणीतरी तुमचं शरीर फाडून अवयव काढणार आहे. हे भयानक आहे. थॉमस आता त्याची बहीण डोना रोहरर सोबत राहत आहे. त्याची स्मरणशक्ती गेली आहे, चालण्यात आणि बोलण्यात त्याला समस्या होतात.

Web Title: Brain dead patient miraculously comes back to life just as doctors prepare to remove heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.