काय सांगता! प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलं होतं २ किलोचं डम्बल, २ दिवसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:40 PM2022-04-13T15:40:02+5:302022-04-13T15:40:13+5:30
Dumbbell stuck in man body : व्यक्तीच्या रेक्टममध्ये म्हणजे पार्श्वभागात एक डंबल फसलेलं होतं. एक्स-रे रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला. प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबल साधारण २ किलो वजनाचं होतं.
जगभरात सतत वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत असतात. अशीच एक विचित्र आणि अविश्वसनीय घटना ब्राझीलमधून (Brazil) समोर आली आहे. इथे एक व्यक्ती डॉक्टरकडे पोट दुखण्याची समस्या घेऊन गेला. पण डॉक्टरांनी जेव्हा त्याचं चेकअप केलं तेव्हा जे दिसलं ते बघून हैराण झाले. व्यक्तीच्या रेक्टममध्ये म्हणजे पार्श्वभागात एक डंबल फसलेलं (Dumbbell stuck in man body) होतं. एक्स-रे रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला. प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबल साधारण २ किलो वजनाचं होतं.
'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ५४ वर्षीय एक व्यक्ती Manaus येथील एका हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. त्याची समस्या ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी त्याचा एक एक्स-रे काढला. एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरचाही विश्वास बसला नाही. या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये २० सेमी लांब डंबल अडकलेलं होतं. जे २ किलो ग्रॅम वजनाचं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, आधी तर व्यक्तीने स्वत:हून प्रायव्हेट पार्टमध्ये अडकलेलं डंबेल काढण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा त्याला ते जमलं नाही तेव्हा दोन दिवसांनी तो डॉक्टरकडे गेला. तोपर्यंत वेदनांमुळे त्याची हालत खराब झाली होती.
डॉक्टरांच्या टीमने मॅन्युअली हे डंबेल व्यक्तीच्या शरीरातून बाहेर काढलं. त्यांनी सांगितलं की, सेक्शुअल प्लेजरच्या नादात व्यक्तीने हे केलं होतं. तीन दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर आता घरी पाठवण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात International Journal of Surgery Case Report मध्ये याबाबत एक डिटेल रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. ज्यात सांगण्यात आलं की, वेळीच जर व्यक्तीच्या शरीरातून डंबेल काढलं नसतं तर समस्या आणखी वाढली असती.