तरूणीची सोन्याची चेन गिळली, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला - काय पुरावा आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:13 PM2023-04-25T12:13:01+5:302023-04-25T12:17:48+5:30

एका व्यक्तीने बीचवर जाऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी केली आणि मग जेव्हा त्याला वाटलं की, तो पकडला जाईल तेव्हा त्याने ती चेन गिळली.

Brazil thief swallowed the gold chain snatched from the girl shocking xray viral | तरूणीची सोन्याची चेन गिळली, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला - काय पुरावा आहे?

तरूणीची सोन्याची चेन गिळली, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला - काय पुरावा आहे?

googlenewsNext

Chain Snatching : चोरीच्या रोज जगभरातून अनेक विचित्र घटना समोर येत असतात ज्या हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एका चोराने चोरी केल्यानंतर अटक होऊ नये म्हणून भलताच कारनामा केला, पण तरीही तो पकडला गेला. ही घटना ब्राझीलमधील आहे. एका व्यक्तीने बीचवर जाऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी केली आणि मग जेव्हा त्याला वाटलं की, तो पकडला जाईल तेव्हा त्याने ती चेन गिळली.

ब्राझीलच्या साओ पाओलो बीचवरील ही घटना आहे. समुद्र किनारी आपला वेळ घालवण्यासाठी अनेक लोक इथे आले होते. इथे चोरीच्या घटनाही नेहमीच घडत असतात. असंच काहीसं महिलेसोबत झालं.

समुद्र किनारी एका महिलेची सोन्याची चेन चोरी केल्यानंतर अटक टाळण्यासाठी व्यक्ती सोन्याची चेन गिळली. नंतर त्याला पोलिसांनी पकडलं. त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी ही चोरी केली होती. 

दरम्यान इथे पोलीस राउंडवर होते. जेव्हा चोर पळून गेले तेव्हा महिलेने पोलिसांना फोन केला. पोलीस लगेच तिथे पोहोचले आणि त्यांनी चोरांना पळून जाताना पाहिलं. पोलिसांनी त्यांना पकडलं. 

पण चोरांकडे काहीच सापडलं नाही आणि उलट चोर म्हणाले की, तुमच्याकडे काय पुरावा आहे की, आम्ही सोन्याची चेन चोरी केली. काही न मिळाल्यानंतर संशयितांना टेस्ट करण्यासाठी नेण्यात आलं. त्यांचा एक्स-रे केला तर सगळे हैराण झाले.

एका चोराच्या एक्स-रेमध्ये स्पष्ट दिसत होतं की, त्याच्या पोटात सोन्याची चेन आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Brazil thief swallowed the gold chain snatched from the girl shocking xray viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.