९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:48 PM2022-04-06T17:48:54+5:302022-04-06T17:55:39+5:30

Model Artur Brazil : आर्थरने गेल्यावर्षी ९ महिलांसोबत एकत्र लग्न केलं होतं. पण या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. कारण ब्राझीलमध्ये बहुविवाह बेकायदेशीर आहे.

Brazilian model Arthur Urso's 1 of 9 wives seeks divorce; “misses monogamy" | ९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती!

९ पत्नींपैकी एकीने घेतला घटस्फोटाचा निर्णय, कारण समजल्यावर हैराण झाला मॉडल पती!

Next

ब्राझिलीयन मॉडल आर्थर (Model Artur Brazil) आपल्या ९ पत्नींसोबत एकाच घरात राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आता या परिवाराबाबत एक बातमी समोर आली आहे. आर्थरच्या एका पत्नीने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत मीडियासोबत बोलताना आर्थरने माहिती दिली. आर्थरने सांगितलं की, या घटस्फोटानंतर त्याला कसं वाटत आहे.

आर्थरने गेल्यावर्षी ९ महिलांसोबत एकत्र लग्न केलं होतं. पण या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. कारण ब्राझीलमध्ये बहुविवाह बेकायदेशीर आहे. आता ९ बायकांपैकी एकीसोबत त्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. 'जॅम प्रेस'सोबत बोलतना आर्थर म्हणाला की, तो त्याच्या एका पत्नीच्या निर्णयाने दु:खी आणि हैराण आहे.

'न्यूयॉर्क पोस्ट'नुसार, आर्थरचं आधीच लुआना काजकीसोबत लग्न झालं होतं. फ्री लव्हबाबत बोलत आणि एक लग्नाचा विरोध करत त्याने ८ आणखी महिलांशी लग्नाचा निर्णय घेतल्यावर तो चर्चेत आला होता.

आता त्याच्या पत्नींपैकी एक अगाथाने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कारण तिला तिच्या पतीवर एकाधिकार हवा होता. जो आर्थरला मान्य नाही. आर्थर याबाबत म्हणाला की, 'तिला माझ्यावर एकाधिकार हवा होता. याला काही अर्थ नव्हता. आपल्याला परिवारासोबत सगळं शेअर करावं लागेल. मी वेगळे होण्याबाबत ऐकून दु:खी होतो. पण तिच्या कारणाने मला हैराण केलं'.

आर्थर असंही म्हणाला की, त्याच्या इतर पत्नींना वाटतं की, अगाथाचं वागणं चुकीचं होतं आणि लग्न एन्जॉय करण्यासाठी स्वीकारलं होतं. वास्तविक भावनांसाठी नाही. तो म्हणाला की, मी माहीत आहे की, मी माझ्या एका पत्नीला गमावलं. पण मी सध्या तिची जागा कुणालाही देणार नाहीये'.

'डेली मेल'नुसार, त्याचं स्वप्न १० पत्नींना एकत्र ठेवण्याचं आहे आणि लवकरच तो हे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारी आहे. मॉडल म्हणाला की, त्याने प्रत्येक पत्नीला एकसारखं प्रेम दिलं आहे.
 

Web Title: Brazilian model Arthur Urso's 1 of 9 wives seeks divorce; “misses monogamy"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.