एकाच मांडवात एका व्यक्तीने ९ महिलांशी केलं लग्न, कारण असं दिलं की म्हणाल वाह रे वाह....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 11:51 AM2021-11-18T11:51:18+5:302021-11-18T12:03:05+5:30

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, मॉडल आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) आधीच विवाहित आहे आणि त्याने त्याच्या हनीमूनचे बोल्ड फोटो शेअर करून धुमाकूळ घातला होता.

Brazilian model marries 9 women at once here is the reason | एकाच मांडवात एका व्यक्तीने ९ महिलांशी केलं लग्न, कारण असं दिलं की म्हणाल वाह रे वाह....

एकाच मांडवात एका व्यक्तीने ९ महिलांशी केलं लग्न, कारण असं दिलं की म्हणाल वाह रे वाह....

Next

ब्राझील(Brazil) मध्ये एका व्यक्तीने एक-दोन-तीन नाही तर तब्बल ९ महिलांसोबत एकाच मंडपात लग्न केलं. साओ पाउलो शहरातील कॅथलिक चर्चमध्ये झालेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ९ महिलांसोबत लग्न करणारा ब्राझीलचा मॉडल आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) म्हणाला की, असं त्याने 'फ्री लव' ला सेलिब्रेट करण्यासाठी केलं.

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, मॉडल आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) आधीच विवाहित आहे आणि त्याने त्याच्या हनीमूनचे बोल्ड फोटो शेअर करून धुमाकूळ घातला होता. आता एकत्र ९ महिलांसोबत लग्न करून तो पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणाला की, तो एक महिलेसोबत लग्न या परंपरेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याने एकाच मंडपात ९ महिलांसोबत लग्न करून Monogamy विरुद्ध आवाज उठवला आहे.

ब्राझीलियन मॉडल त्याची पत्नी लुआना काजाकीसोबत फ्रान्सला हनीमूनला गेला होता. तेथील त्याने असे काही फोटो शेअऱ केले होते की, सगळेच हैराण झाले होते. दोघेही काही फ्रेन्च शहरांमध्ये न्यूड फिरले होते. त्यामुळे त्यांच्यावर टिकाही झाली होती. पण त्याला याने काही फरक पडला नाही.

या कपलने कोरोना महामारी दरम्यान लोकांना शारीरिक संबंधाबाबत टिप्स दिल्या होत्या. ज्यामुळे ते चर्चेत आले होते. दोघे म्हणाले होते की, आम्ही अशा लोकांना शारीरिक संबंधासाठी प्रेरित केलं, ज्यांचं लाइफ कोरोनामुळे घराच्या चार भींतींमध्ये अडकून पडलं होतं. आम्ही त्यांना  वेगवेगळ्या पोजीशनबाबत टिप्स दिल्या. जेणेकरून ते अधिक आनंद मिळवू शकतील.
 

Web Title: Brazilian model marries 9 women at once here is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.