बाबो! मॉडलने तब्बल १३ कोटी रूपये देऊन उतरवला तिच्या 'या' खास अवयवाचा विमा, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 04:22 PM2021-11-12T16:22:42+5:302021-11-12T16:23:21+5:30

Miss Butt World 2021 :

Brazilian model who won miss butt world insurance her butt by paying 13 crore Rs Nathy Kihara | बाबो! मॉडलने तब्बल १३ कोटी रूपये देऊन उतरवला तिच्या 'या' खास अवयवाचा विमा, कारण....

बाबो! मॉडलने तब्बल १३ कोटी रूपये देऊन उतरवला तिच्या 'या' खास अवयवाचा विमा, कारण....

Next

सामान्यपणे लोक आपल्या घराचा, कारचा किंवा जीवनाचा विमा काढतात. मात्र, या जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या विचित्र गोष्टींचे विमे काढले आहेत. आता हेच बघा ना एका ब्राझीलच्या मॉडलने १३ कोटी रूपये देऊन तिच्या Butt चा म्हणजेच पार्श्वभागाचा विमा काढला. मॉडलने एक किताब जिंकल्यानंतर आपल्या शरीराच्या या अवयवाचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. 

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, या ३५ वर्षीय मॉडलचं नाव नाथी किहारा (Nathy Kihara) आहे.  किहाराने नुकताच मिस बट वर्ल्ड २०२१ (Miss Butt World 2021) हा किताब आपल्या नावावर केला. इन्स्टाग्रामवर सर्व स्पर्धकांपेक्षा जास्त सर्वात जास्त लाइक्स मिळवल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड निवडण्यात आलं.

हा किताब जिंकल्यानंतर ३५ वर्षीय किहाराने आपल्या Butt चा विमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने १.३ मिलियन पाउंड (१२ कोटी ९५) लाख रूपये खर्च केले. म्हणजे किहाराने १३ कोटी रूपये देऊन आपल्या पार्श्वभागाचा विमा उतरवला आहे.

मॉडल  किहारा म्हणाली की, 'मी माझ्या Butt मुळे फेमस आहे. मला यासाठी किताबही मिळाला आहे. त्यामुळे मी हा विमा उतरवला  आहे'. किहाराचा दावा आहे की, ती अजूनही तिच्या Butt च्या आकाराने संतुष्ट नाही. ती अधिक व्यायाम करून याचा आकार वाढण्याच्या प्रयत्नात आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नाथी किहाराने याबाबत एक पोस्ट केली. तिने किताब जिंकल्यावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आहेत. किहाराला इन्स्टावर ५६० के फॉलोअर्स आहेत. 
 

Web Title: Brazilian model who won miss butt world insurance her butt by paying 13 crore Rs Nathy Kihara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.