लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:03 AM2023-07-14T10:03:52+5:302023-07-14T10:04:28+5:30

Marriage News : नवरी सार होऊन सासरी पोहोचली. पण कुणालाही याचा अंदाज नव्हता की, ती काय करणार आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

Bride abscond after three days of marriage on suhagraat in Jaipur | लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात'

लग्नाची पहिली रात्र अन् नवरीचा कारनामा, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव 'कोमात'

googlenewsNext

Marriage News : राजस्थानच्या जयपुरमध्ये एका नव्या नवरीचा हैराण कारनामा समोर आला आहे. इथे एका तरूणाने लग्न करण्यसाठी एका एजंटला लाखो रूपये दिले. यानंतर मंदिरात लग्न झालं आणि नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. नवरी सार होऊन सासरी पोहोचली. पण कुणालाही याचा अंदाज नव्हता की, ती काय करणार आहे. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.

जयपुरच्या तरूणाने सांगितलं की, त्याच्या शेजाऱ्याच्या माध्यमातून यूपीतील एका व्यक्तीच्या मुलीसोबत त्याचं लग्न ठरलं होतं. यानंतर मुलीचे वडील पप्पू यादव यांनी एजंट खानकडे लग्नासाठी दीड लाख रूपयांची मागणी केली. 16 एप्रिल रोजी शेजारी गोपालसोबत तरूण जयपुरच्या एका हॉटेलमध्ये पोहोचला.

इथे मुलीच्या वडिलाने 23 वर्षीय मुलगी अंतिमाचं लग्न ठरवलं आणि 19 एप्रिलला कोर्टात स्टॅम्प पेपरवर लिव्ह-इन-रिलेशनशिपचे कागदपत्र तयार केले. त्यानंतर एका गणेश मंदिरात दोघांचं लग्न लावण्यात आलं. यानंतर एजंटने 1 लाख 55 रूपये ऑनलाइन ट्रांसफर केले.

दुसरीकडे नवी नवरी अंतिमाच्या स्वागतासाठी सासरी वेगवेगळी तयारी करण्यात आली. परिवारातील सगळे लोक आनंदी होते. यानंतर वेळ आली सुहागरातची तेव्हा नवरी वेगवेगळी कारणे सांगत संबंध टाळत होती. कुणालाही तिच्या उद्देशाबाबत माहीत नव्हतं. तिने तिचं जाळं पसरवलं.

22 एप्रिलच्या रात्री पती आपल्या पत्नीसोबत झोपला होता. पण जेव्हा त्याचा डोळा उघडला तेव्हा पत्नी गायब होती. त्याने पत्नीचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. यादरम्यान नवरदेवाची नजर रूममधील कपाटाकडे गेली. त्याने पाहिलं तर त्यातील दागिने आणि रोख रक्कम गायब होती. तेव्हा त्यांना सगळं समजलं.

यानंतर नवरदेव एजंटसोबत बोलला. त्यानंतर अनेक महिने तो वेगवेगळी कारणे देत राहिला. पण नवरदेवाच्या परिवाराने पोलिसात तक्रार दिली नाही. यादरम्यान जेव्हा नवरदेवाच्या परिवाराच्या हाती लग्नाआधी पैसे देण्याचा व्हिडीओ लागला तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस आता लुटेरी दुल्हन आणि तिच्या गॅंगचा शोध घेत आहेत.  

Web Title: Bride abscond after three days of marriage on suhagraat in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.