लग्नात नवरीनं नवऱ्याला घातलं मंगळसूत्र; मग पुढे घडलं असं काही......
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:10 PM2021-05-06T13:10:29+5:302021-05-06T13:22:06+5:30
जेव्हा वरानं आपल्या लग्नात आपण मंगळसूत्र घालणार असल्याचं म्हटल्यावर सगळ्यांनाच वाटलं होतं आश्चर्य
लग्नात वधूनंच वराला घातलं मंगळसूत्र; पाहा पुढे का झालं...लग्न म्हणजे सात जन्माचं नातं असल्याचं म्हणतो. दरम्यान, एका अनोख्या लग्नाची एक गोष्ट समोर आली आहे. शार्दुल कदम नावाच्या एका मुलानं आपल्या लग्नात आपण मंगळसूत्र घालणार असल्याचं सांगितलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. परंपरेनुसार वर हा वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असल्याचं आपण पाहिलं आहे. ही अनोखी काहाणी ह्युमन्स ऑफ बॉम्बेनं आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. "जेव्हा फेरे घेतले आणि आम्ही एकमेकांना मंगळसूत्र घातलं त्यावेळी मी खुप खुश होतो," असं शार्दुल कदमनं ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना सांगितलं. आपण हा निर्णय का घेतला आणि या निर्णयानंतर या कपलला कसा ट्रोलिंगचा सामना करावा लागला याबद्दलही त्यानं सांगितलं आहे.
शार्दुल आणि तनुजा यांची भेट कॉलेजमध्ये झाली होती. तसंच आपलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची प्रेम कहाणी पुढे गेली. "मी इन्स्टाग्रामवर हिमेश रेशमीयाचं एक गाणं शेअर केलं होतं. त्यावर मी टॉर्चर असं कॅप्शन दिलं होतं. त्यावर तनुजानं रिप्लाय देत महा टॉर्चर असं म्हटलं. त्यानंतर आमच्यात संवादाला सुरूवात झाली," असं शार्दुलनं बोलताना सांगितलं. काही आठवड्यांनंतर ते चहासाठी एकदा बाहेर भेटले आण फेमिनिस्टबद्दल त्यांच्यात चर्चा झाले. त्यावेळी शार्दुलनं स्वत:ला कट्टर फेमिनिस्ट असल्याचं म्हटलं. त्यानंतर तिनं अशा प्रकारे पाहिलं की तिला अशी काही बोलण्याची अपेक्षाचं नव्हती असं तो म्हणाला.
कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का
शार्दुल आणि तनुजा एका वर्षापर्यंत एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर त्यांचे कुटुंबीयदेखील उत्साहित होते. सप्टेंबर २०२० मध्ये करोनाची पहिली लाट ओसरली तेव्हा त्यांनी लग्नाचं प्लॅनिंग केलं. "असं का होतं की केवळ मुलीलाच लग्नात मंगळसूत्र घालावं लागतं असा प्रश्न मी तनुजाला केला. आपण दोघेही सारखेच आहे. त्यामुळे मीदेखील लग्नात मंगळसूत्र घालणार अशी घोषणा केली," असं त्यानं ह्युमन्स ऑफ बॉम्बेला सांगितलं. यांतर त्यांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तसंच नातेवाईकांनीही यावर प्रश्न उपस्थित केले. त्यावर शार्दुलनं हे समानतेचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं. तसंच लग्नाचा खर्चही दोन्ही कुटुंब करतील अशी तिच्या कुटुंबीयांना सांगितल्याचंही तो म्हणाला.
दरम्यान, त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका डिजिटल वृत्तपत्रानं आमची कहाणी सांगितली होती, असं शार्दुल बोलताना म्हणाला. एकानं तू साडी परिधान कर असा मेसेज लिहिला तर एका ही लैगिक समानता दर्शवण्याची पद्धत नसल्याचं म्हटलं असं त्यानं सांगितलं. "सुरुवातीला या ट्रोलिंगमुळे थोडा त्रास झाला. पण आता लग्नाला चार महिनेही झालेत. त्यामुळे आता काहीच फरक पडत नाही," असंही त्यानं सांगितलं.
नातं अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो...
"आम्ही दोघं आमचं नातं अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आम्ही एकमेकांच्या कामाचं समर्थन करतो आणि स्वप्नांवर विश्वास ठेवतो. आम्ही एकत्र हा प्रवास करत आहोत. जग काय विचार करतं याची पर्वा कोण करतं?," असंही तो म्हणाला. त्यांच्या या निर्णयाचं काही लोकांनी समर्थनही केलं आहे. तसंच देव तुम्हाला अधिक ताकद आणि आनंद देवो असंही एका युझरनं म्हटलं आहे. "मला वराच्या भावनांचा आदर आहे. काही चुकीचं केलंय असं बिलकुल वाटत नाही. मंगळसूत्र हे समानतेचं प्रतीक म्हणून परिधान केलं आहे आणि त्यातून विचारही प्रकट होतात," असं त्यानं सांगितलं.