होणाऱ्या नवऱ्याने लग्नातील पाहुण्यांबाबत ठेवली विचित्र अट, महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:16 PM2022-03-11T18:16:44+5:302022-03-11T18:20:00+5:30
कोणाला लग्नात बोलवायचं, कोणाला नाही,...यात अनेकांची मतं घेऊन ठरवणं खरंच अवघड असतं. याचा विचार करणाऱ्या एका नवरीने यावरुन होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद घातला.
कोणत्याही लग्नात (Marriage) खूप तयारी करावी लागते. वेन्यू, मेन्यू, डेकोरेशन, शॉपिंग, वेडिंग ड्रेस, मेकअप आणि सर्वांत विशेष म्हणजे गेस्ट लिस्ट. सर्वाधिक वेळ आणि डोकं यातच घालावं लागते. कोणाला लग्नात बोलवायचं, कोणाला नाही,...यात अनेकांची मतं घेऊन ठरवणं खरंच अवघड असतं. याचा विचार करणाऱ्या एका नवरीने यावरुन होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद घातला.
होणाऱ्या नवरीने गेस्ट लिस्टमध्ये आपल्या सावत्र भाऊ-बहिणींची नावं लिहिली होती. जी पाहून होणाऱ्या नवरदेवाने यास नकार दिला. लग्नात केवळ कुुटुंबातील सदस्य येऊ शकतात असं सांगून त्यांना नकार दिला. हे ऐकताच नवरी संतापली आणि गेस्ट लिस्टवरुन दोघेही एकमेकांसोबत भांडण करू लागले. आता नवरीने सोशल साइट रेडिटवर वाद सोडविण्यासाठी आणि होणाऱ्या नवऱ्याच्या वागणुकीबद्दल लोकांकडून प्रतिक्रिया विचारली आहे.
रेडिटवर तरुणीने आपली ही समस्या शेअर केली आहे. नवरीने युजर्सना सांगितलं की, तिचं होणाऱ्या नवऱ्यासोबत पाहुण्यांच्या यादीवरुन वाद झाला आहे. (There was an altercation between him and his fiancee over the guest list). या व्यतिरिक्त दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरुन दुमत नव्हतं. तरुणाने होणाऱ्या पत्नीला न विचारचा त्या दोघांचं नाव गेस्ट लिस्टमधून हटवलं. सावत्र बहिणींना लग्नात येण्यावरुन नवरदेव तयार नव्हता. मात्र तरुणी त्याचं काहीच ऐकायला तयार नव्हती.
महिलेने हादेखील खुलासा केला की, तिच्या सावत्र बहिणींनी फोन करून याबाबत तिला सांगितलं. जे ऐकून तिला वाईट वाटलं. यानंतर होणाऱ्या नवरदेवासोबत बोलल्यानंतर तिला नेमका प्रकार लक्षात आला. यावर नवरदेवाने सांगितलं की, दुसरा पर्याय नव्हता. कारण यादी कमी करण्याची गरज होती. त्यांना आपल्या अत्यंत जवळच्या वा घरातील सदस्यांनाच बोलवायचं होतं. आता युजर्सनी महिलेला लग्न मोडण्याचा सल्ला दिला आहे. जो तिच्या कुटुंबाचा मान राखू शकत नाही आणि तुझ्या इच्छेची पर्वा करीत नाही अशा मुलासोबत लग्न करू नये.