बोंबला! लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना सोडवावे लागतील गणिताचे प्रश्न, बक्षिसही मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 12:51 PM2019-01-14T12:51:14+5:302019-01-14T12:54:12+5:30

लग्नांमध्ये आता वेगवेगळ्या परंपरांसोबतच काही मजेदार गोष्टीही केल्या जातात. काही लोक लग्नात येण्यासाठी ड्रेस कोड ठेवतात, काही लोक आणखी काही वेगळं करतात.

Bride ask guests for math test on her wedding day | बोंबला! लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना सोडवावे लागतील गणिताचे प्रश्न, बक्षिसही मिळणार!

बोंबला! लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना सोडवावे लागतील गणिताचे प्रश्न, बक्षिसही मिळणार!

Next

(Image Credit : www.kidspot.com.au)

लग्नांमध्ये आता वेगवेगळ्या परंपरांसोबतच काही मजेदार गोष्टीही केल्या जातात. काही लोक लग्नात येण्यासाठी ड्रेस कोड ठेवतात, काही लोक आणखी काही वेगळं करतात. पण कधी लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना गणिताचे प्रश्न सोडवावे लागल्याचं तुम्ही ऐकलं का? नाही ना? पण आता असं होणार आहे. म्हणजे बघा ना एका लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना चक्क गणितांचे प्रश्न सोडवण्यास सांगण्यात येणार आहे. का तर नवरा आणि नवरी दोघेही मॅथमॅटीशिअन आहेत. त्यांनी त्यांच्या या लग्नाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. काहीतरी वेगळं करावं आणि मनोरंजन व्हावं म्हणून त्यांनी ही आयडियाची कल्पना काढली. 

काय आहे प्लॅन?

सोशल मीडियावर एका व्यक्तीने सोशल पोस्ट शेअर केली होती. यात भावी वधूने तिच्या लग्नाची योजना सांगितली. या पोस्टमध्ये सांगितले की, तिच्या लग्नात गणिताचा बोलबाला राहिल. हे करण्याचं कारण काय तर दोघेही गणितज्ज्ञ आहेत. तसेच दुसरं कारण म्हणजे सिटींग अरेंजमेंटही व्यवस्थित व्हावी यासाठी हे केलं जात आहे. आता नवरा-नवरीला तर हे फारच आवडलं पण पाहुण्यांना किती आवडेल माहीत नाही. 

भावी नवरीने हेही सांगितले की, गणित सोडवलं तर काय बक्षिस मिळणार आहे. त्यानंतर तर फेसबुकवर कमेंटचा पाऊस आला. त्यावरुन हे दिसतं की, पाहुण्यांना हा विचार फारच आवडला. यात काही चांगल्याच मजेदार कमेंटी आल्या आहेत. पण आता गणित सोडवणं हे काही सर्वांच्या आवडीचं काम नाही, त्यामुळे लग्नात कुणाकुणाची फजिती होणार हेही लोकांना बघायला मिळणार आहे. 

Web Title: Bride ask guests for math test on her wedding day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.