डोकं फिरलया या बयेचं! नवरीबाई म्हणे, लग्नात जितकं महागडं गिफ्ट त्यानुसार प्रत्येकाला जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 09:08 PM2022-07-14T21:08:57+5:302022-07-14T21:12:47+5:30
अगदी लग्नपत्रिकेपासून ते कपडे, दागिने, ठिकाण, सजावट, भोजन अशा अनेक गोष्टींमध्ये नावीन्य आणण्यावर भर दिला जातो. अमेरिकेतील अशाच एका कपलच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका (Wedding Invitation) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण असतो. हा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना लढवत असतात. अगदी लग्नपत्रिकेपासून ते कपडे, दागिने, ठिकाण, सजावट, भोजन अशा अनेक गोष्टींमध्ये नावीन्य आणण्यावर भर दिला जातो. अमेरिकेतील अशाच एका कपलच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका (Wedding Invitation) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
लग्नपत्रिकांमध्ये नवरा-नवरीचं नाव, लग्नाचं स्थळ, लग्नाच्या कार्यक्रमांची वेळ दिलेली असतं. पण या लग्नपत्रिकेत यासोबतच लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी अशी अट ठेवण्यात आली आहे, की सर्वांनाच धक्का बसला आहे.
सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल की लग्नाच्या पत्रिकेत अगदी शेवटी काही लोक आहेराचाही उल्लेख करताना दिसतात. आहेर किंवा भांडी आणू नयेत, असा आशय आपण पाहतो. पण या लग्नपत्रिकेत गिफ्टबाबत असं काही नमूद केलं आहे, हे तुम्हीही हैराण व्हाल. लग्नात जो जसं गिफ्ट देईल, त्याला तसंच जेवण मिळेल, अशी अट या पत्रिकेत आहे. म्हणजे जो जितकं महागडं गिफ्ट देईल तितकं त्याला चांगला जेवण खायला मिळेल.
गिफ्टनुसार पाहुण्यांच्या कॅटेगिरी आणि त्यांच्यासाठी जेवणाचा वेगवेगळा मेन्यूही तयार करण्यात आल्या. ‘लव्हिंग गिफ्ट’ (Loving Gift) या पहिल्या श्रेणीत 250 डॉलर्स म्हणजेच सुमारे 18 हजार रुपये किमतीची भेट देणाऱ्या पाहुण्यांना चिकन किंवा मासे यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘सिल्व्हर गिफ्ट’ (Silver Gift) श्रेणीत 36 हजार रुपयांची भेट देणाऱ्या लोकांना रोस्टेड चिकन किंवा सालमन मासे, तसंच स्टेक यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘गोल्डन गिफ्ट’ (Golden Gift) श्रेणीत 73 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूंच्या बदल्यात लॉब्स्टर टेल्स आणि फिले मिग्नॉन्स यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल. ‘प्लॅटिनम भेटवस्तू’ (Platinum Gift) या श्रेणीतल्या लोकांना सुमारे अडीच लाख रुपयांची भेट आणावी लागेल. या लोकांना वरील तीन श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांसह शॅम्पेन आणि लॉबस्टर यांचा समावेश असलेलं भोजन दिलं जाईल.
सोशल मीडियावर लग्नाची ही पत्रिका व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तर नवरीबाईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असंही म्हटलं आहे. तर एका युझरने आपलं गिफ्ट महाग आहे, असं सांगून भरपेट खाण्याचा आनंद लुटावा असा सल्ला दिला आहे.