लोकांना हिऱ्याची अंगठी दाखवत होती महिला, फोटोत कैद झाला लघुशंका करणारा बॉयफ्रेन्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 03:45 PM2021-08-18T15:45:08+5:302021-08-18T15:52:09+5:30
रेडिटवर महिलेने एंगेजमेंटच्या रिंगचा फोटो शेअर केला. तिला लोकांसोबत तिचा हा खास क्षण शेअर करायचा होता. पण फोटोमध्ये लोकांना भलतंच काहीतरी दिसून आलं.
सोशल मीडियावर लोक आपल्या लाइफसंबंधी रोजचे अपडेट्स शेअर करत असतात. दूर असलेल्या नातेवाईक-मित्रांसोबत आपले स्पेशल क्षण शेअर करणं सोशल मीडिया फार उत्तम माध्यम आहे. एका महिलेने जी लवकर नवरी होणार आहे तिने सोशल मीडियावर तिची एंगेजमेंटच्या रिंगचा फोटो शेअर केला. पण फोटोत लोकांना असं काही दिसलं ज्याची महिलेने कल्पनाही केली नसेल.
रेडिटवर महिलेने एंगेजमेंटच्या रिंगचा फोटो शेअर केला. तिला लोकांसोबत तिचा हा खास क्षण शेअर करायचा होता. पण फोटोमध्ये लोकांना भलतंच काहीतरी दिसून आलं. ज्यामुळे हा फोटो व्हायरल झाला आहे. फोटोत मागे महिलेचा होणारा नवरा लघुशंका करताना दिसत आहे. त्यासोबत महिलेने पोस्टमध्ये कॅप्शन लिहिलं की, 'स्वप्नातील राजा, स्वप्नातील अंगठी, स्वप्नातील प्रपोजल पोस्ट. ही पोस्ट रेडिटवर शेअर केली आहे. जी व्हायरल झाली आहे. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! गर्लफ्रेन्डला इंग्रजीत फेल होण्याची होती भीती, बॉयफ्रेन्ड मुलगी बनून तिचा पेपर द्यायला गेला आणि....)
या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, त्याला आधी वाटलं की, तिचा होणारा पती मासे पकडत आहे. पण इथे तर वेगळाच सीन आहे. एका दुसऱ्या व्यक्तीने कमेंट केली की, फोटो बघून त्यालाही बाथरूमला जाण्याची इच्छा होत आहे. एंगेजमेंट रिंगवर तर कुणाचं लक्षही गेलं नाही. महिलेने यावरून आपली नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, होणाऱ्या पतीमुळे तिच्या एंगेजमेंट रिंगचं महत्व कमी झालं.