लग्नाच्या पहिल्या रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली नवरी, अतिउत्साहात सरकलं खांद्याचं हाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:26 PM2022-04-25T13:26:26+5:302022-04-25T13:27:51+5:30
मिररच्या रिपोर्टनुसार, नवरीचं नाव एवलिन मॅककूल आहे. तिचं लग्न पीटर मॅककॅपिन नावाच्या तरूणासोबत होत होतं. लग्नाच्या दिवशी एक डान्स कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं.
कोणत्याही नवरी-नवरदेवासाठी त्यांच्या लग्नाचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात खास असतो. हा दिवस यादगार बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात. कुणी खास पद्धतीने एन्ट्री घेतलं तर कुणी डान्स परफॉर्मन्स करतं. हे बघून पाहुण्यांनाही आनंद होतो. असंच काहीसं ब्रिटनमधील एका नवरीसोबत झालं. ती तिच्या लग्नादरम्यान डान्स करत असताना जखमी झाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
मिररच्या रिपोर्टनुसार, नवरीचं नाव एवलिन मॅककूल आहे. तिचं लग्न पीटर मॅककॅपिन नावाच्या तरूणासोबत होत होतं. लग्नाच्या दिवशी एक डान्स कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं. ज्यात एवलिन आपल्या नवरदेवाला इम्प्रेस करण्यासाठी डान्स परफॉर्मन्स करत होती. या दरम्यान तिच्यासोबत एक वाईट घटना घडली आणि वेडिंग ड्रेसमध्येच तिला स्ट्रेचरच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाच्या डान्सची घोषणा झाली. एवलिन डान्स फ्लोरवर आली. ती हसत-अदा दाखवत जोशमध्ये डान्स करत होती. यावेळी तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. खाली पडत असताना तिने डाव्या हाताने स्वत:ला जमिनीवर पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अशातच तिच्या खांद्याचं हाड सरकलं. ती वेदनेने ओरडत होती. तर लगेच लोकांनी तिला स्ट्रेचरच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेलं. इथे रात्रीभर तिच्यावर उपचार केले गेले आणि दुसऱ्या दिवशी तिला सुट्टी देण्यात आली.
आयटी कंपनीत काम कऱणाऱ्या एवलिनने स्वत: या घटनेबाबत मिररला सांगितलं. ती म्हणाली की, 'तिचा पती एक चांगला डान्सर आहे आणि लग्नातील डान्स कॉम्पिटिशनमध्ये मला त्याला मागे सोडायचं होतं. त्याच जोशात मी डान्स करत होते. तेव्हाच ही घटना घडली'. लग्नाच्या दिवशीच ही घटना झाल्याने लग्नाची पहिली रात्र घरी राहण्याऐवजी तिला हॉस्पिटलमध्ये काढावी लागली. दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.