नवरदेवाने मंडपातच केलं 'अश्लील' वर्तन, नवरीने लगेच लग्न करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:58 AM2022-12-01T09:58:44+5:302022-12-01T10:01:10+5:30

Bride Cancel Wedding : एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा नवरीने नवरदेवावर आरोप लावला की, तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आलं. 

Bride cancel wedding on stage while groom did something wrong with her in Sambhal | नवरदेवाने मंडपातच केलं 'अश्लील' वर्तन, नवरीने लगेच लग्न करण्यास दिला नकार

नवरदेवाने मंडपातच केलं 'अश्लील' वर्तन, नवरीने लगेच लग्न करण्यास दिला नकार

googlenewsNext

Bride Cancel Wedding :  लग्नातील नवरी-नवरदेवांचे फनी व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. अनेकदा नवरदेवाचे तर कधी नवरींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. पण एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा नवरीने नवरदेवावर आरोप लावला की, तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यात आलं. 

ही घटना संभलच्या एका लग्न मंडपातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना नुकतील एका सामुहिक लग्न सोहळ्यात झाली. हे लग्न संभलच्या पवास गावात सुरू होतं. यावेळी अनेक जोडप्यांची लग्ने लावण्यात आलीत. पण एका नवरदेवावर असे आरोप लागले की, एकच गोंधळ उडाला.

रिपोर्ट्सनुसार, या लग्नात एका नवरीने अचानक लग्न करण्यास नकार दिला. नवरी आणि नवरदेव दोघेही बदायूं जिल्ह्यातील राहणारे होते. असं सांगण्यात आलं की, सामूहिक कार्यक्रमानंतर स्थानिक रिती-रिवाज सुरू होते. यादरम्यान ही घटना घडली. जयमाला रिवाज सुरू असताना नवरदेवावर नवरीसोबत अश्लील वर्तन करण्याचा आरोप लागला. ज्यानंतर नवरी संतापली.

नवरी म्हणाली की, आधी तर नवरदेवाने तिला किस केलं आणि त्यांनंतर अश्लील वर्तन केलं. त्यामुळे नवरीने रागात लग्न करण्यास नकार दिला. लग्नास नकार दिल्याने वराती आणि घरातील लोकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. नवरदेव म्हणाला की, नवरीने स्वत: किस करण्याची पैज लावली होती. पण नंतर नवरदेवाला वरात परत न्यावी लागली.

Web Title: Bride cancel wedding on stage while groom did something wrong with her in Sambhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.