नवरदेवाचा चेहरा बघताच नवरीने लग्नास दिला नकार, कारण वाचून लोक झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 04:57 PM2023-05-18T16:57:36+5:302023-05-18T16:58:22+5:30
नवरी-नवरदेवाला रितीरिवाजासाठी मंडपात आणणार इतक्यात नवरदेवाला पाहून नवरी भडकली आणि लग्न करण्यास नकार दिला.
Bride Cancel Wedding: बिहारमधून एक हैराण करणारी करणारी घटना समोर आली आहे. इथे ऐन लग्न लागणार इतक्यात नवरदेवाला पाहताच कथितपणे नवरीने लग्न करण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार, कहलगावातील नवरीचं लग्न 15 मे रोजी धनौरा गावातील एका तरूणासोबत ठरलं होतं. कथितपणे ठरलेल्या तारखेला नवरदेव आपली वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला आणि सगळीकाही व्यवस्थित सुरू होतं. नवरी-नवरदेवाला रितीरिवाजासाठी मंडपात आणणार इतक्यात नवरदेवाला पाहून नवरी भडकली आणि लग्न करण्यास नकार दिला.
नवरदेवाला पाहताच नवरीने लगेच लग्न करण्यात नकार दिला. असं सांगण्यात आलं की, बऱ्याच लोकांनी समजावून सांगितलं तरी नवरीने कुणाचं ऐकलं नाही आणि स्टेजवरून उतरून आपल्या रूममध्ये गेली. नंतर जेव्हा लग्नाला नकार देण्याचं कारण विचारलं तरी तिने सांगितलं की, नवरदेव सावळा आहे आणि वयानेही मोठा दिसतो. सांगण्यात आलं की, सगळ्यांनी तिला समजावलं, पण नवरीने ऐकलं नाही. यावेळी नवरदेवाचा पिताही नवरीला समजावत होता.
बराचवेळ समजावून सांगितल्यानंतर वरातीला नवरीविनाच परत जावं लागलं. कारण ती नवरदेवासोबत लग्न करण्यास तयार झाली नाही. नवरीच्या वडिलांना आपल्या मुलीच्या या वागण्याबाबत काहीच माहीत नव्हतं. ते म्हणाले की, मला नाही माहीत ती असं का वागली. सोशल मीडियावर ही घटना समोर आल्यावर लोकही हैराण झाले. लोक म्हणाले की, आता आधीसारखं राहिलं नाही की, मुली गपचूप लग्न करतील. आता त्यांना त्यांची मतं, आवड आहे. मग त्या गावातील असो वा शहरातील.