इथे लग्नानंतर तीन दिवस बाथरूमला जाऊ शकत नाही नवरी, जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:50 PM2024-09-19T14:50:29+5:302024-09-19T14:52:23+5:30
Marriage Weird Rituals : आज आम्ही तुम्हाला परदेशातील लग्नाची एक अशी प्रथा सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही कपळावर हात मारून घ्याल.
Marriage Weird Rituals : लग्नाबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज असतात. कुठे मुलींना पळवून नेऊन लग्न केलं जातं तर कुठे आणखी काही केलं जातं. भारतातही वेगवेगळ्या भागांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही प्रथा तर इतका वेगळ्या असतात की, त्यावर विश्वासही बसत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला परदेशातील लग्नाची एक अशी प्रथा सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही कपळावर हात मारून घ्याल.
नवीन जोडप्यासाठी अनोखा नियम
इंडोनेशियामध्ये लग्नानंतर एक अनोखी प्रथा पाळली जाते. लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याला टॉयलेटला जाण्यास बंदी असते. हा प्रथा इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायातील लोक पाळतात. या समुदायातील लोक या प्रथेला फार महत्वपूर्ण समजतात. या रिवाजानुसार नवीन जोडपं तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही. असं करणं अपशकुन मानला जातो.
काय आहे मान्यता?
स्थानिक लोकांनुसार लग्न ही एक पवित्र प्रथा आहे आणि अशात ते लोक टॉयलेटला गेल्यास त्यांची पवित्रता भंग पावते. सोबतच नववधू वर याने अशुद्ध होतात.
आणखी एक कारण...
इंडोनेशियामध्ये ही प्रथा पाळण्याचं आणखी एक कारण म्हणजे नववधू आणि वराला नजर लागू नये हेही आहे. त्यांची मान्यता आहे की, टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. ते त्यांच्या शरीरातील घाण काढतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये नकारात्मक शक्ती असते. लग्न झाल्यानंतर लगेच टॉयलेटला गेल्यास ती नकारात्मकता नव्या जोडप्यामध्येही प्रवेश करते.
या लोकांची अशीही एक धारणा आहे की, लग्नानंतर लगेच टॉयलेटचा वापर केल्यास नवीन जोडप्याचं नातंही धोक्यात येतं. कधी कधी नातं तुटतं. दोघांनाही टॉयलेटला जावं लागू नये म्हणून दोघांनाही खाण्यासाठी कमी दिलं जातं. समुदायातील सर्व लोक हा रिवाज काटेकोरपणे पाळतात.