दुकानादाराने केलेल्या 'त्या' कृत्याची नवरीला आला संताप, म्हणून तिने दुकानातले कपडेच फाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:09 PM2022-01-18T18:09:48+5:302022-01-18T18:13:03+5:30
भडकलेली नवरी (Angry Bride) काय करेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. असंच एक प्रकरण चीनच्या चोंगकिंग शहरात पाहायला मिळालं.
लग्नाच्या वेळीच अचानक समजलं की नवरीसाठी तयार केला जाणारा ड्रेस कॅन्सल केला गेला आहे आणि दुकानदार अॅडवान्स परत द्यायलाही तयार नाही, तर एखाद्या नवरीची काय अवस्था होईल? नवरीच्या रागाचा आपण अंदाज लावूही शकतो. मात्र यानंतर भडकलेली नवरी (Angry Bride) काय करेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. असंच एक प्रकरण चीनच्या चोंगकिंग शहरात पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका भडकलेल्या नवरीने दुकानात जात एक-एक करून अनेक लग्नाचे कपडे फाडले (Bride Cut Up Many Wedding Dress at Bridal Salon). ही घटना तेव्हा घडली, जेव्हा स्टोअरने एक ऑर्डर अचानक कॅन्सल केली आणि यासाठी देण्यात आलेला अॅडवान्स परत देण्यासही नकार दिला.
महिलेचं नाव जियांग असं असल्याचं समोर आलं आहे आणि ती दक्षिण-पश्चिम शहर चोंगकिंगमधील एका ब्रायडल सलूनमध्ये जाऊन कात्रीने कपडे फाडताना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. घटना ९ जानेवारीची आहे. डेली मेलने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं, की जियांगने ११ हजार डॉलर म्हणजेच ८ लाख १२ हजार ६३ रुपयांचे ३२ लग्नाचे ड्रेस फाडले. महिलेनं १ हजार २५० डॉलर म्हणजेच ९२ हजार ८१३ रुपयांचा एक ड्रेस ऑर्डर केला होता. ही ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर तिनं केलेलं ४० हजार ८३७ रुपयांचं अॅडवान्स पेमेंट परत करण्यास दुकानाने नकार दिल्याने महिलेनं हे कृत्य केलं.
This angry customer at a Chongqing bridal salon took out scissors and cut up wedding dress after wedding dress. The video has since gone viral on social media. pic.twitter.com/LSRXoI0OAa
— What's on Weibo (@WhatsOnWeibo) January 13, 2022
चीनी सोशल मीडिया नेटवर्क वीबो आणि ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिला स्टोरमध्ये जाऊन गोंधळ घालताना दिसते. न थांबता ती अनेक कपडे कापत राहाते. व्हिडिओमध्ये कोणाचातरी आवाजही ऐकू येतो, की नीट विचार कर, या ड्रेसेसची किंमत खूप जास्त आहे. यावर होणारी नवरी उत्तर देते, 'हजारो? भलेही ती कितीतरी दहा-हजार असो'. असं म्हणून पुढे ते हे कपडे फाडतच राहाते