ऐन सप्तपदीच्या वेळी नवरीने लग्नास दिला नकार आणि मग दुसऱ्या दिवशी....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:50 PM2023-02-10T12:50:54+5:302023-02-10T12:52:57+5:30

Bride Refuse to Marriage : नवरदेव बॅंड बाजासोबत गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला होता. स्वागत आणि हार घालण्याचा रिवाजही झाला होता. घरातील सगळे लोक आनंदात होते आणि काही वेळाने फेरे होणार होते.

Bride denied to marry with groom married with lover Prayagraj love story | ऐन सप्तपदीच्या वेळी नवरीने लग्नास दिला नकार आणि मग दुसऱ्या दिवशी....

ऐन सप्तपदीच्या वेळी नवरीने लग्नास दिला नकार आणि मग दुसऱ्या दिवशी....

googlenewsNext

Bride Refuse to Marriage : उत्तर प्रदेशच्या मेवालालच्या बगियामधून लग्नाची एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका नवरीने भर मंडपात नवरदेवासोबत लग्न करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव बॅंड बाजासोबत गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला होता. स्वागत आणि हार घालण्याचा रिवाजही झाला होता. घरातील सगळे लोक आनंदात होते आणि काही वेळाने फेरे होणार होते.

नवरीला मंडपात आणण्यात आलं. पण तिने सगळ्यांसमोर सप्तपदी घेण्यास नकार दिला. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. आई-वडिलांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि अब्रू वाचवण्याची विनंतीही केली. पण नवरी लग्न न करण्याच्या हट्ट धरून बसली होती.

तेच या कारणाने नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये वाद पेटला. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्हीकडील परिवारांना समजावलं. तेव्हा वरात परत गेली. पण या कहाणीत दुसऱ्या दिवशी सकाळी ट्विस्ट आला. त्यावेळी नवरीकडील लोक त्यांचं गेस्ट हाऊसमधील सामान जमा करत होते. तेव्हाच तिथे नवरीचा प्रियकर पोहोचला. तो नवरीला लग्न करण्यासाठी घेऊन गेला.

या घटनेमुळे सगळेच हैराण झाले आणि सध्या परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे. तेच पोलिसांनी सांगितलं की, लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेवाकडील लोकांना समोरासमोर बसवून समजावण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी नवरी तिच्या प्रियकरासोबत सार झाली. सध्या याप्रकरणी कुणाचीही पोलिसात तक्रार नाही.  

Web Title: Bride denied to marry with groom married with lover Prayagraj love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.