बोंबला! मधुचंद्राच्या रात्रीच दुखलं नवरीचं पोट, हॉस्पिटलमध्ये नेलं अन् दिला तिने बाळाला जन्म...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 02:02 PM2024-02-22T14:02:52+5:302024-02-22T14:05:18+5:30
रात्री त्यांचा मधुचंद्र होणार होता. पण सायंकाळी अचानक नवरीच्या पोटात वेदना सुरू झाल्या. घरातील लोक नवरीला लगेच जिल्हा महिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मग...
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये मंगळवारी एक नवरी लग्नानंतर आपल्या सासरी पोहोचली. घरात आनंदाचं वातावरण होतं. लोक खूश होते. गावातील लोक जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी घरी येत होते. त्याच दिवशी त्यांची सुहागरात म्हणजे मधुचंद्र होता. त्याच दिवशी नवरीच्या पोटात जोरात वेदना होऊ लागल्या होत्या. घरातील लोक तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. इथे घडलं ते बघून घरातील लोक हैराण झाले. त्यांनी गोंधळ सुरू केला.
इथे मंगळवारी एक नवी नवरी लग्न होऊन आली होती. घरात सगळीकडे आनंद आणि जल्लोष होता. याच रात्री त्यांचा मधुचंद्र होणार होता. पण सायंकाळी अचानक नवरीच्या पोटात वेदना सुरू झाल्या. अशात घरातील लोक नवरीला लगेच जिल्हा महिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. इथे नव्या नवरीने एका बाळाला जन्म दिला.
बाळाच्या जन्मानंतर पती आणि सासरच्या लोकांनी एकच गोंधळ सुरू केला.
नवरदेव म्हणाला की, हे बाळ त्याचं नाही. तर सासरच्या लोकांनी सूनेला घरात ठेवण्यास नकार दिला. यानंतर हॉस्पिटलमध्ये चांगलाच वाद पेटला. वाद पाहून बरेच लोक जमा झाले. सकाळपर्यंत सगळ्यांना याची माहिती मिळाली.
नवरदेवाच्या मोठ्या भावाची मेहुणी आहे नवरी
हा वाद समोर आल्यावर महिला समाजसेवी संस्था आराधाना गुप्ता हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यांनी नवरदेव आणि कुटुंबियांनी समजावून वाद शांत केला. सोबतच सूनेला सोबत ठेवण्यासाठीही तयार केलं. चौकशीतून समोर आलं की, सून कुणी अनोळखी नाही तर नवरदेवाच्या मोठ्या भावाची मेहुणी आहे.
दोघांमध्ये होते प्रेमसंबंध
नवरदेवाने यावेळी सांगितलं की, लग्नाआधी त्यांच्यात प्रेमसंबंध होते. बाळ त्याचच आहे. पण याचा अंदाज नव्हता की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डिलेव्हरी होईल. सगळं प्रकरण समोर आल्यावर सासरच्या लोकांनी बाळ आणि नवरीला आनंदाने घरी नेलं.