लग्नाच्या काही दिवसांनंतरच सोडून गेली नवरी, लाउडस्पीकर घेऊन पोहोचला पती!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:28 PM2022-12-06T13:28:13+5:302022-12-06T13:28:43+5:30

China : हेनान प्रांतात राहणाऱ्या 25 वर्षीय होऊ ने ली नावाच्या तरूणीसोबत लग्न केलं होतं. दोघांची भेट 2021 मध्ये ऑनलाईन झाली होती. पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते.

Bride left after a month husband wants divorce and money refund | लग्नाच्या काही दिवसांनंतरच सोडून गेली नवरी, लाउडस्पीकर घेऊन पोहोचला पती!

लग्नाच्या काही दिवसांनंतरच सोडून गेली नवरी, लाउडस्पीकर घेऊन पोहोचला पती!

googlenewsNext

China : लग्नाच्या एका महिन्यानंतरच एका व्यक्तीने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. त्याने लग्नात 50 लाख रूपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. आता तो पत्नीकडे 16 लाख रूपयांची मागणी करत आहे. यासाठी त्याने पत्नीच्या घराबाहेर एक बॅनर आणि एक लाउडस्पीकर लावला. याद्वारे तो लग्नात खर्च केलेले पैसे परत मागत आहे. त्याच्या या कृत्याची चीनी सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Jimu News नुसार, हेनान प्रांतात राहणाऱ्या 25 वर्षीय होऊ ने ली नावाच्या तरूणीसोबत लग्न केलं होतं. दोघांची भेट 2021 मध्ये ऑनलाईन झाली होती. पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. ज्यामुळे ती त्याला सोडून गेली.

जेव्हा काहीच होऊ शकलं नाही तेव्हा होऊ ने घटस्फोटासाठी अर्ज केला. पण तेव्हा त्याचा अर्ज फेटाळला गेला. त्यानंतर होऊ ने पुन्हा अपील केली. आता पुढील महिन्यात यावर सुनावणी होणार आहे.

होऊ म्हणाला की, त्याने लग्नात 58 लाख रूपये खर्च केले होते. पण आता जेव्हा लग्न मोडणार आहे त्यामुळे त्याला पैसे परत हवे आहेत. होऊ याने त्याच्या पत्नीकडे 16 लाख रूपयांची मागणी केली आहे. यासाठी त्याने अनोखी आयडिया केली आहे.  त्याने ली च्या घरासमोर एक बॅनर लावला. त्यावर पैशांबाबत लिहिलं. त्याशिवाय त्याने एक लाउडस्पीकरही लावला आहे. ज्यावरून तो त्याची मागणी सतत ऐकवतो.

होऊ याने सांगितले की, त्याने लग्नात 18 लाख रूपये आपल्या नातेवाईकांना मागितले होते. बाकी रक्कम त्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी जमवली होती. लग्न धुमधडाक्यात पार पडलं. यात ली ला एक कार, रोख रक्कम आणि काही गिफ्ट्स देण्यात आले होते. पण आम्हाला फक्त ते दागिने परत हवे आहेत जे आम्ही तिला विकत घेऊन दिले. दागिन्यांची किंमत 5 लाख होती आणि रोख रक्कम 11 लाख रूपये. असे एकूण 16 लाख रूपये मला परत हवे आहेत. 
 

Web Title: Bride left after a month husband wants divorce and money refund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.