लग्नानंतर सासरी जात होती नवरी, नवरदेवाला खोटं सांगत रस्त्यातूनच बॉयफ्रेन्डसोबत फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:37 PM2022-07-05T15:37:02+5:302022-07-05T15:37:08+5:30
Bride Run Away : कारमध्ये बसलेल्या नवरदेवाला नवरी म्हणाली की, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून लगेच येते. ती कारमधून उतरली, बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली.
Bride Run Away : वाराणसीच्या जन्सा गावात एका लग्नाचा शेवट असा काही होईल याचा कुणीही विचारही केला नसेल. तरूणीचे कुटुंबिय दु:खी मनाने मुलीला सार करून मोकळे झाले होते, तर दुसरीकडे तरूणाचे कुटुंबिय नवरीच्या स्वागतासाठी तयारी करत होते. तेव्हाच सासरी जात असलेल्या तरूणीचं प्रेम जागं झालं आणि तिने प्रियकराला कळवलं की, ती नवरदेवासोबत सासरी जात आहे. तेव्हाच कारमध्ये बसलेल्या नवरदेवाला नवरी म्हणाली की, जवळच्या व्यक्तीसोबत बोलून लगेच येते. ती कारमधून उतरली, बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली.
नवरीला घेऊन फरार झाला प्रियकर
दुसऱ्या कारमध्ये नवरीचा प्रियकर होता, ज्यातून तो तिला पळवून घेऊन गेला. हे सगळं नवरदेवाच्या डोळ्यांसमोर झालं. ही घटना गावाच्या बाहेरच्या पुलाजवळ घडली. घटनेनंतर नवरदेवाने जेव्हा याची माहिती नवरीच्या कुटुंबियांना दिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. गावात आता हीच चर्चा सुरू आहे. शनिवारी लग्न झालं आणि रविवारी पाठवणी झाली. त्यानंतर नवरी फरार झाली.
पाठवणीनंतर नवरी नवरदेवासोबत आपल्या सासरी निघाली होती आणि रस्त्यातच ती फरार झाली. दुसरी कार नवरीला घेऊन बडागांवकडे गेली. स्थानिक लोकांनी सांगितलं की, ज्या तरूणीचं लग्न झालं तिचं एका तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांना एकमेकांसोबत रहायचं होतं. पण कुटुंबियांनी याला विरोध केला. संधी मिळताच दोघे फरार झाले. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.