वरातीत आलेल्या पाहुण्यांनी केलं असं काही, मंडप सोडून पळाली नवरी; म्हणाली - मी त्याच्याशी लग्न कसं करू?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 01:27 PM2021-08-07T13:27:45+5:302021-08-07T13:29:29+5:30
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये लग्नात नवरदेवासोबत आलेल्या वरातीने असं काही केलं की, नवरीने ऐनवेळी लग्न करण्यात नकार दिला. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली.
भारतीय लग्ने फारच रोमांचक असतात. लग्नात रितीरिवाज, तामझाम, गोंधळ, भांडणं, जल्लोषात चालवल्या जाणाऱ्या गोळ्या इत्यादी कारणांमुळे लग्ने चर्चेत राहतात. उत्तर प्रदेशातील अशाच एका लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये लग्नात नवरदेवासोबत आलेल्या वरातीने असं काही केलं की, नवरीने ऐनवेळी लग्न करण्यात नकार दिला. इतकंच नाही तर याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली.
आयएनएनच्या एका रिपोर्टनुसार, मेरठमध्ये सुरू असलेल्या या लग्नात नवरदेवाकडील काही पाहुण्यांनी लग्नादरम्यान बंदुकीची फायरिंग केली. यात २२ वर्षीय नवरीचे काका जखमी झाले. यामुळे नवरीने नवरदेव शहजादसोबत लग्नास नकार दिला. (हे पण वाचा : एका जाहिरातीमुळे बदललं महिलेचं आयुष्य, समोर आलं पतीचं धक्कादायक सत्य)
नवरी इरम म्हणाली की, 'मी त्याच्यासोबत लग्न कशी करू शकते? जर त्यांचा परिवार माझ्या संपूर्ण परिवारासमोर अशाप्रकारे व्यवहार करत आहे, तर मी जेव्हा एकटी त्यांच्या घरी राहणार तेव्हा ते माझ्यासोबत कसा व्यवहार करतील?'.
मुलीने जसा आपला निर्णय ऐकवला. तिच्या नातेवाईकांनी नवरदेवाची कार तोडली. सोबतच नवरदेवाच्या नातेवाईकांची धुलाई सुद्धा केली. तसेच त्यांना काही वेळासाठी बंदीही बनवून ठेवलं. नंतर पोलिसांनी येऊन स्थिती कंट्रोलमध्ये ठेवली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नवरीच्या काकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सीनिअर सब-इन्स्पेक्टर रवींद्र पलात यांनी सांगितलं की, 'लग्नातील व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून फायरिंग करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. नवरदेव शहजाद, त्याचा भाऊ पप्पू आणि शानू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर फायरिंग लायसेन्स हत्यारांनी करण्यात आली असेल तर लायसन्स रद्द करण्याची नोटीस पाठवली जाईल'.