बोंबला! नवरदेवाला १.२० लाख रूपये पगार, तरीही नवरीने वेळेवर लग्नास दिला नकार; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:46 PM2024-11-25T12:46:14+5:302024-11-25T12:47:03+5:30
इंजिनिअर मुलासोबत लग्न ठरवल्यानंतर लग्नाच्या दिवशी नवरदेव वाजत-गाजत वरात घेऊन गेला. नवरीकडील लोकांनी वरातीचं स्वागतही केलं.
लग्नाच्या वेगवेगळ्या हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. कधी नवरदेव काही कारणाने लग्न वेळेवर मोडते, तर कधी नवरी काही कारणाने वेळेवर लग्न मोडते. अनेकदा तर कारणंही खूप अजब असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. लग्नाचे काही रितीरिवाज पार पडल्यानंतरही नवरदेवाला नवरीशिवाय घरी परत जावं लागलं. अर्ध्यापेक्षा जास्त रितीरिवाज पार पडल्यावर नवरीला समजलं की, नवरदेवाला सरकारी नोकरी नाही. अशात तिने लग्नास नकार दिला. अशात नवरदेवाला वरात परत न्यावी लागली.
न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, इंजिनिअर मुलासोबत लग्न ठरवल्यानंतर लग्नाच्या दिवशी नवरदेव वाजत-गाजत वरात घेऊन गेला. नवरीकडील लोकांनी वरातीचं स्वागतही केलं. त्यानंतर लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज सुरू झाले. मात्र, सप्तपदी होण्याआधीच नवरीने नवरदेवाला सरकारी नोकरी नसल्याचं कारण देत लग्नास नकार दिला. त्यामुळे दोन्हीकडील लोकांना एकच धक्का बसला. दोन्हीकडील पक्षात बराच वेळ चर्चा झाली. मात्र, नवरीचे कुटुंबिय आणि नवरी लग्नास तयार झाली नाही. त्यानंतर पंचायत बोलवण्यात आली.
एका व्यक्तीने आपल्या मुलीचं लग्न छत्तीसगढच्या बलरामपूर येथील इंजिनिअर तरूणासोबत जुळवलं होतं. मध्यस्ती व्यक्तीने सांगितलं होतं की, मुलगा कन्नोजला भाड्याने राहतो. तो सरकारी इंजिनिअर आहे. त्याकडे ६ प्लॉट आणि काही जमीन आहे. अशात लग्न ठरलं आणि काही दिवसांनी वरातही आली. वेगवेगळे रितीरिवाज पार पडले. काही वेळाने नवरीला समजलं की, नवरदेव प्रायव्हेट नोकरी करतो. अशात तिने लग्न करण्यास नकार दिला.
नवरीने स्पष्ट शब्दात सांगितलं की, ती प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यासोबत लग्न करणार नाही. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. काही लोकांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्नही केला. इतकंच नाही तर नवरदेवाने त्याची पे स्लीपही नवरीला दाखवली. ज्यात त्याला 1,20,000 रूपये महिना पगार असल्याचं दिसलं. तरीही नवरीने काही ऐकलं नाही. त्यानंतर समाजातील लोकांनी दोन्ही पक्षांचा जो खर्च झाला तो एकमेकांना देण्याचं ठरलं. त्यानंतर नवरदेव वरात घेऊन परत गेला.