नवरदेवाला म्हणाली नवरी - 'जेवण करा आणि निघून जा, मी लग्न करणार नाही'; कारण वाचून बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:34 PM2023-03-02T15:34:00+5:302023-03-02T15:35:07+5:30
नवरी म्हणाली की, वरात घेऊन आले तर जेवण करा, वरमाला पण झाली आणि आता घरी जा, मला लग्न करायचं नाहीये.
Trending News: कानपूरच्या अकबरपूर येथील एका हॉलमध्ये सोमवारी लग्न सुरू होतं. बॅंड वाजत होता. लोक आनंदात होते. मुलीच्या कुटुंबियांना आनंद होता की, त्यांच्या मुलीचं आज लग्न आहे आणि मुलांकडील लोकांना याचा आनंद होता की, त्यांच्या घरी सून येणार आहे. पण या लग्नात असं काही झालं ज्याचा कुणी विचार केला नसेल. यावेळी नवरदेवाला समजलं की, नवरीने आधीच प्रियकरासोबतकोर्ट मॅरेज केलं आहे तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. लग्नातील कुणीतरी पोलिसांना सूचना दिली.
सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि हस्तक्षेप करून वाद मिटवला. नवरीने नवरदेवासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की, हार यासाठी गळ्यात घातला जेणेकरून वरातीलसमोर त्यांचं नाक कापलं जाऊ नये आणि वराती परत जाऊ नये. पण याच्यासोबत मी सप्तपदी घेणार नाही. कारण मी आधीच कोर्ट मॅरेज केलं आहे. नवरी म्हणाली की, वरात घेऊन आले तर जेवण करा, वरमाला पण झाली आणि आता घरी जा, मला लग्न करायचं नाहीये. पोलिसांसमोर प्रियकराने नवरीसोबत सप्तपदी घेतली आणि त्याच्यासोबत लखनौला सार झाली.
अकबरपूरच्या शंकर दयाल नगरातील एका तरूणीचं लग्न चौबेपूरच्या एका पोलीस शिपायासोबत ठरलं होतं. हे लग्न अकबरपूरमधील एका लॉनमध्ये आयोजित केलं होतं. सोमवारी नवरदेव वरात घेऊन लॉनमध्ये पोहोचला. डान्सनंतर रिती-रिवाज सुरू झाले. त्यानंतर नवरीच्या वडिलांना समजलं की, मुलीने लखनौच्या एका तरूणासोबत आधीच कोर्ट मॅरेज केलं आहे.
हे लग्न तिने घरातील लोकांपासून लपवलं होतं. दुसरीकडे वडिलांनी मुलीच्या आधीच्या लग्नाबाबत नवरदेव आणि त्याच्या परिवाराला सांगितलं तर वाद सुरू झाला. दोन्हीकडील लोकंमध्ये मारहाण सुरू झाली. कुणीतरी पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी वातावरण शांत केलं. त्यानंतर नवरीने प्रियकराला फोन करून लखनौवरून बोलवलं. मंगळवारी सकाळी तो नातेवाईकांसोबत लॉनमध्ये पोहोचला. तिथे पोलिसांसमोर त्यांनी लग्न केलं.