बाबो! 'या' घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार अन् एक्स बॉयफ्रेंडसोबत झाली फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:09 PM2021-09-21T13:09:52+5:302021-09-21T13:11:32+5:30
अमेरिकेतील मेरीलॅंडमध्ये लग्न मंडपात असं काही झालं ज्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. इथे नवरी ऐन लग्नावेळी फरार झाली.
लग्नाचा दिवस हा प्रत्येक कपलसाठी खास असतो. हा दिवस यादगार व्हावा म्हणून लोक खूप काही करतात. लग्नात मजा-मस्ती आणि काही वादही होतात. अशातही कार्यक्रम सुरळीत पार पडतो आणि कपलही आनंदी राहतं. पण कधी कधी लग्नात अशा काही घटना घडतात की, सगळेच हैराण होतात. अशीच एक विचित्र घटना अमेरिकेतील एका कपलच्या लग्नात घडली. सध्या या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अमेरिकेतील मेरीलॅंडमध्ये लग्न मंडपात असं काही झालं ज्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. इथे नवरी ऐन लग्नावेळी फरार झाली. २४ वर्षीय सिएरिया तिच्या २८ वर्षीय बॉयफ्रेन्ड सॅमसोबत लग्न करणार होती. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही ट्रॅव्हलर आहेत. पण झालं असं की, लग्नाच्या नवरदेव दारू पिऊन लग्न मंडपात आला. हे पाहून सिएरियाचा मूड खराब झाला. इतकंच नाही तर तिने सॅमसोबत लग्न मोडलं. (हे पण वाचा : लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे')
हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही तर सिएरियाचा एक्स बॉयफ्रेन्ड कायली याच लग्नात आला होता. घडलेला प्रकार पाहून त्यानेच सिएरियाला समजावून सांगितलं की, तिने सॅमसोबत लग्न करू नये. त्याने तिला त्याच्यासोबत पळून जाण्याचाही सल्ला दिला. सिएरियालाही त्यावेळी ते योग्य वाटलं आणि ती कायलीसोबत पळून गेली.
डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, एक्स बॉयफ्रेन्ड कायलीनं सिएरियाला सांगितलं की, सॅमची ही अवस्था पाहून त्याला तिची दया येत आहे. तसंच तू तुझं संपूर्ण आयुष्य सॅमसारख्या व्यक्तीसोबत घालवावं असं मला वाटत नाही. यानंतर कायली आणि सिएरिया यांनी लग्नमंडपातच एकमेकांना किस केलं आणि यानंतर दोघंही फरार झाले. हा संपूर्ण किस्सा अमेरिकी टीव्ही शो जिप्सी ब्राईड्सचा आहे.