बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:36 PM2021-03-15T12:36:42+5:302021-03-15T12:44:41+5:30
आग्र्यातील एका घरी रविवारी वरात आली. स्वागत समारंभानंतर जेव्हा सप्तपदीचा तयारी झाली तेव्हा नवरदेव बदलल्याचा आरोप करत नवरीने लग्नास नकार दिला.
लग्न म्हटलं की, नेहमीच काहीना काही विचित्र किस्से ऐकायला मिळतात. कधी भांडणाचे तर कधी जेवणाचे. आता एक लग्नाचा वेगळाच किस्सा समोर आला आहे. आग्र्यातील एका घरी रविवारी वरात आली. स्वागत समारंभानंतर जेव्हा सप्तपदीचा तयारी झाली तेव्हा नवरदेव बदलल्याचा आरोप करत नवरीने लग्नास नकार दिला. खूप समजावल्यानंतरही नवरी काही ऐकली नाही तेव्हा नवरदेव आणि वरातीतील लोकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
ही घटना आहे विष्णुपुरा गावातील. इथे राहणाऱ्या करिश्माचं लग्न कानपूर नगरच्या जयप्रकाशसोबत ठरलं होतं. रविवारी रात्री वरात आली आणि वरातही दणक्यात निघाली. जेवण झाल्यावर नवरदेव सप्तपदीसाठी गेला तर नवरीने त्याचा चेहरा पाहिल्यावर नवरदेव बदलल्याचा आरोप केला आणि लग्नास नकार दिला. (हे पण वाचा : पतीच्या डोक्यावर केस नाहीत....पती सेल्फी काढत नाही, मेरठमधील घटस्फोटाच्या विचित्र कारणांनी व्हाल हैराण...)
नवरी म्हणाली की, ज्या नवरदेवाचा फोटो तिने पाहिला होता तो हा नाहीच. त्याच्या जागी दुसरा नवरदेव आणला आहे. दोन्ही कुटुंबिय बराच वेळ तिला समजावत राहिले. पण ती काहीच ऐकत नसल्याचं पाहून नवरदेव आणि त्याचे पाहुणे पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी नवरीवर आणि तिच्या परीवारावर कारवाईची मागणी केली. (हे पण वाचा : लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...)
ती म्हणायची, भेटला नाही तर मरेल...
नवरदेव जयप्रकाश म्हणाला की, लग्न ठरलं आणि एक महिना आम्ही दिवस-दिवसभर फोनवर बोलत होतो. अनेकदा बोलण्याच्या नादात आम्ही जेवण केलं नाही. ती म्हणायची की, तू जर मला भेटला नाही तर ती विष खाऊन जीव देईल आणि तुला फसवेन. आता लग्नाची वेळ आली तर तिने असं केलं. आम्हाला आमचा खर्च झालेला पैसा परत हवा आहे. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)
एडीट केला होता फोटो
दबक्या आवाजात लोक सांगत आहेत की, लग्नासाठी पाठवण्यात आलेल्या फोटोत मोबाइल अॅपचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे फोटोत आणि प्रत्यक्षात चेहऱ्यात फरक दिसत आहे. पण हे नवरदेवाच्या परिवाराकडून याबाबत काही सांगण्यात आलं नाही. पोलीस म्हणाले की, दोन्ही पक्षासोबत बोलणी सुरू आहे. लवकरच कारवाई केली जाईल.