इथे लग्नाआधी नवरींना दिलं जातं या गोष्टीचं ट्रेनिंग, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 05:08 PM2022-09-27T17:08:19+5:302022-09-27T17:08:30+5:30
लग्नात मुलींना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा तणाव असतो. आपलं घर सोडून नव्या घरात सगळं काही सांभाळण्यापासून नवरीच्या मनात वेगवेगळी घालमेल सुरू असते.
Indian Bride: भारतात लग्ने फारच जल्लोषात आणि भव्य पद्धतीने केली जातात. पाहुण्यांची लांबच लांब लिस्ट, खाण्याचे वेगवेगळे आयटम, धमाकेदार डान्स सोबतच वेगवेगळ्या रितीरिवाजांमध्ये नवरी-नवरदेवाकडील लोक बिझी असतात. तसे तर घरातील महिलाच नवरीला रितीरिवाजांबाबत सांगतात. पण अलिकडे एक असंही ट्रेनिंग दिलं जातं ज्याबाबत तुम्ही ऐकलंही नसेल.
भारतात लग्नाआधी आणि लग्नानंतर वेगवेगळे रितीरिवाज पार पाडले जातात. या रिवाजांमध्ये हळद, शूज लपवणं, मेहंदी, अंगठी शोधणं, सोबत आंघोळ असे अनेक रितीरिवाज असतात. लग्नानंतर नवरी तिच्या नवरदेवासोबत आपल्या सासरी जाते.
तुम्हीही कधीना कधी पाठवणीवेळी इमोशनल झाले असाल किंवा डोळ्यातून पाणी आलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, भारतात एक महिला नवरींना त्यांच्या लग्नाआधी रडण्याचं ट्रेनिंग देते. ऐकायला हे भलेही वेगळं वाटत असलं तरी हे खरं आहे.
आजच्या ट्रेंडमुळे लोक त्यांच्या गोष्टींबाबत फारच संवेदनशील राहतात. याच भावनेमुळे लोक आपल्या फोटोंवर अनेक फिल्टरचा वापरही करतात आणि हीच इनसिक्योरिटी नवरींना पाठवणीचं ट्रेनिंग घेण्यास भाग पाडते. पाठवणी वेळ रडणं समाजातील एक भाग झाला आहे.
लग्नात मुलींना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा तणाव असतो. आपलं घर सोडून नव्या घरात सगळं काही सांभाळण्यापासून नवरीच्या मनात वेगवेगळी घालमेल सुरू असते. याच वेगवेगळ्या तणावामुळे नवरी ना रडू शकत ना नीट हसू शकत. हेच कारण आहे की, राधा नावाच्या एका महिलेने सात दिवसांचं ट्रेनिंग सुरू केलं आहे.
भोपाळमध्ये राधा नावाच्या या महिलेने हे क्लासेस सुरू केले आहेत. ज्यात ती लग्न करणार असणाऱ्या तरूणींना रडण्याचा अभिनय कसा करायचा हे शिकवते. या महिलेनुसार, हे क्लासेस केल्यावर नवरी रडताना एकदम नॅच्युरल दिसते. नवरींनाही अशी व्हिडीओत आणि फोटोत वास्तविकता टाकणं आवडतं.