"नवरदेवावर प्रेमच नाही"; ढसाढसा रडत नववधूने सांगितलं लग्न करण्यामागचं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 05:03 PM2023-01-11T17:03:35+5:302023-01-11T17:08:41+5:30
एका 20 वर्षीय तरुणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती स्वतःच्या लग्नावर रडताना दिसत आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये आजही मुलींचे जबरदस्तीने लग्न लावले जाते. देश कितीही विकसित झाला तरी दबावामुळे मुलीचे लग्न लावून दिले जाते. असाच एक प्रकार चीनमधून समोर आला आहे. येथे एका 20 वर्षीय तरुणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती स्वतःच्या लग्नावर रडताना दिसत आहे. पतीवर प्रेम नसून केवळ आई-वडिलांना आनंद व्हावा यासाठी लग्न केल्याचं मुलीचं म्हणणं आहे. तेव्हापासून चीनमध्ये सक्तीच्या विवाहाच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे.
यान असं या तरुणीचं नाव आहे. ती गुइझोउ प्रांतातील आहे. यानने एका ऑनलाईन पोस्टमध्ये सांगितले की, ती लग्न करण्याचा विचार करत नव्हती, पण तरीही तिला हे करायचे होते. ती तिच्या पतीला ब्लाइंड डेटवर भेटली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, यानने लग्नात पांढरा ड्रेस परिधान केला होता. यान म्हणते की तिने फक्त तिच्या पालकांच्या अपेक्षा आणि सांस्कृतिक नियमांचे पालन केले. यानने सांगितलेल्या गोष्टींशी जगभरातील अनेक मुली सहमत असतील.
यानने म्हटले आहे, 'माझे आई-वडील म्हातारे होत होते आणि माझंही वय वाढत आहे. माझे नातेवाईक माझ्यावर दबाव आणत होते आणि शेजारी माझ्याबद्दल चर्चा करत होते. तिने सांगितलं की तिला फक्त पती हवा आहे जेणेकरून ती तिच्यावर टाकला जाणारा दबाव संपवू शकेल. या कारणास्तव, तिने ब्लाइंड डेटवर भेटलेल्या व्यक्तीशी लग्न केलं.
यान म्हणते की तिला स्वतःचे कोणतेही भविष्य नाही. आई-वडिलांना दिलासा देण्यासाठी तिने हे लग्न केले आहे. यानची ही गोष्ट चीनच्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडिओवर 11 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सचं म्हणणे आहे की यान तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी होणार नाही, तर काहींचे म्हणणे आहे की ती आनंदी असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"