बाबो! २१ बाळांना जन्म देणाऱ्या महिलेकडे पुन्हा गुड न्यूज, ....तर यावेळी होईल कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:25 PM2019-10-22T12:25:09+5:302019-10-22T12:35:46+5:30
आजच्या काळात जिथे दोन मुलांचं पालन-पोषण करणं अवघड जातं, तिथे ब्रिटनमधील एका कुटूंबातील महिलेने आतापर्यंत २१ बाळांना जन्म दिलाय आणि हैराण करणारी बाब म्हणजे आता पुन्हा एकदा ही महिला गर्भवती आहे.
आजच्या काळात जिथे दोन मुलांचं पालन-पोषण करणं अवघड जातं, तिथे ब्रिटनमधील एका कुटूंबातील महिलेने आतापर्यंत २१ बाळांना जन्म दिलाय आणि हैराण करणारी बाब म्हणजे आता पुन्हा एकदा ही महिला गर्भवती आहे. म्हणजे ती आता तिच्या २२ व्या बाळाला जन्म देणार आहे. एका यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून महिलेने तिचे अल्ट्रासाउंड रिपोर्ट दाखवत ती गर्भवती असल्याचे सांगितले.
या महिलेचं नाव सू रॅडफोर्ड(४४) असून तिच्या पतीचं नाव नोएल(४८) आहे. हे दोघे ब्रिटनमधील मोरेकॅम्बेमध्ये राहतात. सू आणि नोएल परिवाराल ब्रिटनमधील सर्वात मोठा परिवार मानलं जातं. त्यांचा बेकरीचा कौटुंबिक व्यवसाय आहे. सगळे मिळून हाच व्यवसाय करतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सू ने गेल्या नोव्हेंबरमध्ये एका मुलीला जन्म दिला होता. आता ती १५ आठवड्यांची गर्भवती आहे. ती पुढील वर्षी एप्रिलमध्ये २२व्या बाळाला जन्म देणार आहे. तिला आशा आहे की, ती यावेळी मुलाला जन्म देईल. तिचं म्हणणं आहे की, यावेळी जर तिने मुलाला जन्म दिला तर तिच्या अपत्यांमध्ये ११ मुलं आणि ११ मुली होतील.
सू आणि नोएल यांच्या घरात एकूण १० खोल्या आहेत. ज्यात ते सगळे मिळून राहतात. रिपोर्ट्सनुसार, नवव्या मुलाच्या जन्मानंतर पती नोएलने नसबंदी केली होती. पण नंतर त्याने पुन्हा सर्जरी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सू आणि नोएल यांचा सर्वात मोठा मुलगा क्रिस आणि मुलगी सोफी आता त्यांच्यासोबत राहत नाहीत. पण इतर सगळीच मुलं त्यांच्यासोबत राहतात. सर्वात हैराण करणारी बाब तर ही आहे की, सू आणि नोएल आता आजी-आजोबाही झाले आहेत. त्यांची सर्वात मोठी मुलगी सोफीचं लग्न झालं असून तिला ३ मुले आहेत.