श्वानासाठी कपलला गहाण ठेवावं लागलं त्यांचं घर, पूर्ण घटना वाचून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 01:21 PM2024-05-11T13:21:17+5:302024-05-11T14:09:14+5:30
एक दिवस त्यांची मुलगी रूबीला बागेत फिरवत होती. तेव्हाच जॅक रूजवेल क्रॉस ब्रीडच्या एका दुसऱ्या श्वानाने रूबीवर हल्ला केला.
पाळीव प्राण्यांवर लोक किती प्रेम करतात याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. बरेच लोक तर श्वानांची आपल्या लेकरांसारखी काळजी घेतात. ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. एका व्यक्तीसोबतही असंच झालं. त्यांच्या श्वानासोबत असं काही घडलं की, त्यांना आपलं राहतं घरी गहाण ठेवावं लागलं. इतकंच नाही तर त्यांना घर विकावं सुद्धा लागू शकतं.
मिररच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणारी लन होल्डम आणि एलन बॅमफोर्डकडे एक श्वान आहे. ज्याचं नाव रूबी आहे. एक दिवस त्यांची मुलगी रूबीला बागेत फिरवत होती. तेव्हाच जॅक रूजवेल क्रॉस ब्रीडच्या एका दुसऱ्या श्वानाने रूबीवर हल्ला केला. त्या श्वानाने रूबीचं पोट फाडलं आणि पाठीचं हाडही मोडलं. होल्डमने सांगितलं की, रूबीच्या आतड्या बाहेर आल्या होत्या.
इतकंच नाही तर त्या श्वानाने माझ्या मुलीवरही हल्ला केला. तिचाही हात मोडला.
होल्डमने सांगितलं की, आम्ही मुलीला आणि डॉगी रूबीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. पण त्यावेळी पशु चिकित्सालय बंद होतं. एक तासांच्या शोधानंतर आम्हाला एक हॉस्पिटल सापडलं. कायलीला औषध देण्यात आलं. तिला आराम मिळाला. पण रूबीची स्थिती गंभीर होती. तिची जीभ बाहेर आली होती आणि तोंडातून रक्तही येत होतं. आम्ही रूबीला एका कापडात गुंडाळून नेलं होतं. रात्रभर ऑपरेशन केलं गेलं. डॉक्टरांनी रूबीचा जीव वाचवला. पण हॉस्पिटलचं बिल धक्का देणारं होतं.
24 लाख रूपये आलं बिल
हॉस्पिटलने आधी रूबीच्या उपचाराचं बिल 6 हजार पाउंड म्हणजे साधारण 6 लाख रूपये सांगितलं. पण जेव्हा नंतर समजलं की, रूबीच्या पाठीच्या हाड मोडलं आहे तेव्हा बिल दुप्पट झालं. आयसीयूमध्ये ठेवल्याने रोज 40 हजार रूपये खर्च होत होते.
जेव्हा हे लोक रूबीला घेऊन घरी येण्याची तयारी करत होते. तेव्हा समजलं की, त्यांचं बिल 24 लाख रूपये झालं आहे. होल्डम म्हणाली की, आम्हाला धक्का बसला. आमच्याकडे इतके पैसेही नव्हते. आम्हाला फक्त रूबीला वाचवायचं होतं. आता पैसेच नाही त्यामुळे आम्हाला घर गहाण ठेवावं लागलं. त्यातूनही बिल फेडता आलं नाही तर घर विकावं लागणार आहे.