केवळ ९० रूपयांना घेतली होती फूलदानी, आता मिळाली ४.४ कोटी रूपये किंमत, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 03:32 PM2019-11-11T15:32:02+5:302019-11-11T15:34:06+5:30
इथे एका व्यक्तीने एका चॅरिटी शॉपमधून ९० रूपयांना एक फूलदानी खरेदी केली होती.
जेव्हा नशीब चमकतं तेव्हा एखाद्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. इथे एका व्यक्तीने एका चॅरिटी शॉपमधून ९० रूपयांना एक फूलदानी खरेदी केली होती. नंतर त्याला समजलं की, ही फूलदानी ३०० वर्ष जुनी आहे. तर त्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि एका चीनी व्यक्तीने ही फूलदानी तब्बल ४८४ पाउंड म्हणजेच ४.४ कोटी रूपयांना खरेदी केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही फूलदानी ३०० वर्ष जुनी असून १८व्या शतकातील एका चीनी शासकाचा याच्याशी संबंध आहे. त्यामुळे ही फूलदानी खास झाली आहे. या फूलदानीवर १७३५ ते १७९६ पर्यंत चीनवर शासन करणारे सम्राट कियानलोंग यांच्याशी संबंधित चिन्ह आहेत.
या फूलदानीची बनावटही फार वेगळी आहे. सामान्यपणे फूलदानी या टेबलवर ठेवण्यासाठी तयार केल्या जातात. पण ही फूलदानी भींतीवर लावण्यासाठी तयार केली होती. त्यासोबतच या फूलदानीचा पिवळा रंगही फार महत्वाचा आहे. कारण हा रंग १७व्या आणि १८व्या शतकात चीनी शासकांसाठी आरक्षित होता.
ब्रिटनमधील व्यक्तीने ही फूलदानी वेगळ्या बनावटीमुळे खरेदी केली होती. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, त्यांना फार आनंद झाला आहे. लिलावातून मिळालेल्या पैशातून ते त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचं भविष्य चांगलं करतील. दरम्यान, कियानलोंग क्विंग वंशाचे सहावे सम्राट होते. त्यांचं निधन ८७ व्या वयात १७९९ मध्ये झालं होतं.