प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 05:38 PM2021-08-12T17:38:49+5:302021-08-12T17:44:44+5:30
केकचा हा तुकडा लग्नाच्या २३ अधिकृत केकपैकी एका केकचा आहे. जो ब्रिटिश शाही कपलने आपल्या लग्नात कापला होता.
राजकुमार चार्ल्स आणि दिवंगत राजकुमारी डायना यांच्या लग्नातील केकचा एक तुकडा १,८५० पाउंडमध्ये लिलावात विकला गेला. भारतीय करन्सीनुसार ही किंमत १,९०,५८५ रूपये इतकी होते. काल्पनिक कथांमध्ये ऐकतो तशा झालेल्या या ४० वर्षापूर्वीच्या लग्नातील केकचा तुकडा आता इतक्या किंमतीला विकला जाणं फारच आश्चर्यकारक आहे. केकचा हा तुकडा लग्नाच्या २३ अधिकृत केकपैकी एका केकचा आहे. जो ब्रिटिश शाही कपलने आपल्या लग्नात कापला होता.
केकची आयसिंग आणि बदामच्या मिठाईपासून तयार बेसमध्ये शाही 'कोट ऑफ आर्म्स' ला विशेष डिझाइनमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा तुकडा क्लीन मदरच्या स्टाफमधील एक सदस्य मोया स्मिथला दिला गेला होता. ज्याला एका प्लास्टिकमध्ये बांधून तिने संरक्षित केला होता आणि त्यावर २९ जुलै १९८१ तारीखही लिहिली होती. (हे पण वाचा : बाबो! ४७ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली १९ वर्षीय तरूणी, आता रोमान्ससाठी शिक्षण सोडायलाही तयार)
बीसीसीच्या वृत्तानुसार, स्मिथने केकचा हा तुकडा एका जुन्या केक टिनमध्ये ठेवला होता आणि त्याच्या झाकणावर हाताने लिहिलेलं एक लेबल लावलं होतं. ज्यात लिहिलं होतं की, 'काळजीपूर्वक स्पर्श करा, राजकुमार चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नाचा केक'. स्मिथच्या परिवाराने हा केक २००८ मध्ये एका संग्राहकला विकला होता.
या केकच्या लिलावात जगभरातील लोकांनी सहभाग घेतला होता आणि केकचा तुकडा बुधवारी गेली लेयटन यांना विकण्यात आला. केकच्या या तुकड्याला केवळ ५०० पाउंड मिळतील अशी अपेक्षा होती. पण लिलावकर्ते म्हणाले की, ते मिळालेल्या किंमतीने हैराण झाले आहे.