लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:20 PM2021-09-20T12:20:30+5:302021-09-20T12:24:19+5:30
४० वर्षीय लिसाने आपली कहाणी टीएलसीच्या यूट्यूब पेजवर शेअर केली आहे आणि वेदनादायी घटनांची माहिती दिली आहे.
ब्रिटनमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या तीन दिवसाआधी नवरीने एका बाळाला जन्म दिला. ज्याबाबत समल्यावर सगळेच हैराण झाले. आता महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना सर्वांसोबत शेअर केली आहे. आणि तिने सांगितलं की, तिला या गोष्टींचा अजिबात अंदाज नव्हता की, ती गर्भवती आहे.
४० वर्षीय लिसाने आपली कहाणी टीएलसीच्या यूट्यूब पेजवर शेअर केली आहे आणि वेदनादायी घटनांची माहिती दिली आहे. तिने सांगितलं की, 'मी विचार केला होता की, आई होण्यासाठी आता मी फार म्हातारी झाली आहे. पण लग्नाच्या तीन दिवसाआधी अचानक मला वेदना सुरू झाल्या आणि मला लगेच इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मी एका बाळाला जन्म दिला. जेव्हा मी बाथरूमला गेली आणि तेव्हा लक्षात आलं की, काहीतरी वेगळं आहे. कारण रक्त वाहत होतं'. (हे पण वाचा : अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...)
'द सन'च्या रिपोर्टनुसार, प्रेग्नेन्सीमध्ये सामान्यपणे वजन वाढतं. पण लिसाने सांगितलं की, तिचं वजन वाढण्याऐवजी कमी झालं होतं. त्यासोबतच तिने व्हिडीओत सांगितलं की, तिला प्रेग्नेन्सीसंबंधी कोणतेही सामान्य लक्षण दिसत नव्हते. जसे की, मळमळ होणे किंवा स्तनांमध्ये वेदना होणे'.
प्रेग्नेन्सीचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह
लिसाने सांगितलं की, 'दोन महिने पाळी न आल्याने मी प्रेग्नेन्सी टेस्ट केली. ज्याचा रिझल्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे मला वाटलं की, ही मेनोपॉजची सुरूवात आहे. चार महिने होऊनही पाळी न आल्याने मी पुन्हा एक प्रेग्नेन्सी टेस्ट केली. पण त्यावेळीही काही रिपोर्ट आला नाही आणि यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह आला'.
होणारा पतीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला
लिसाने सांगितलं की, 'मी माझा जोडीदार जेसनसोबत लग्न करणार होते. त्याच्या सोबत एका रेस्टॉरन्टमध्ये काम करण्या दरम्यान भेट झाली होती. लग्नाच्या तीन दिवसाआधी मी रक्ताने माखली होती. त्यानंतर जेसन मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. इथे डॉक्टरांनी सांगितलं की, तिचा गर्भपात झाला आहे. जेव्हा लिसाने सांगितलं की, ती गर्भवती नाहीये. तर डॉक्टरांनी टेस्ट केली'.
७ महिन्यांची होती गर्भवती
डॉक्टरांनी टेस्ट केल्यावर सांगितलं की, ती साधारण २८ ते ३० आठवडे म्हणजे साधारण ७ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यासोबतच डॉक्टरांनी सांगितलं की, लिसाला प्लेसेंटा तुटल्याने जास्त ब्लीडिंग होत आहे. असं तेव्हा होतं जेव्हा प्लेसेंटा वेळेआधी गर्भाशयापासून वेगळा होतो.
ऑपरेशनवेळी बाळाचा जन्म
प्लेसेंटा तुटण्याचा अर्थ असा की, बाळाला आईकडून होणारा रक्त पुरवठा बंद होणार होता. त्यामुळे डॉक्टरांनी इमरजन्सीमध्ये लिसाचं ऑपरेशन केलं आणि प्रीमेच्योर बाळाला बाहेर काढलं. जन्मावेळी बाळाचं वजन १.९२ किलो ग्रॅम इतकं होतं.